Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

निवडणूक गुजरातची अन् मोदी बोलतात पाकविषयी: राहुल

वृत्तसंस्था

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील मुद्द्यांवर बोलण्यापासून पळत आहेत. जसा एखादा चित्रपट फ्लॉप होतो, तशी भाजपची विकास यात्रा फ्लॉप झाली आहे.

निवडणुका गुजरातमध्ये असताना मोदी जपान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविषयी बोलत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. मोदी आणि राहुल गांधी यांनी प्रचाराचा धुरळा उडवत चुरस निर्माण केली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होणार आहे. आज (सोमवार) बनासकांठा येथे झालेल्या सभेत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, की निवडणुका गुजरातमध्ये होत असून, त्यांनी थोडा वेळ गुजरातविषयी बोलले पाहिजे. ते जपान, पाकिस्तान, अफगाणिस्तानविषयी बोलत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलावरील आरोपांप्रकरणी मोदींनी एक शब्दही बोललेला नाही. तसेच त्यांनी आतापर्यंत लोकपालचीही नियुक्ती केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT