siring injection 
देश

भाजप आमदाराचा पुतळा हॉस्पिटलमध्ये उभारा; काँग्रेसचा टोला

सकाळ वृत्तसेवा

कामरेजमधील पाचवी नापास भाजप आमदार व्ही. डी. झालावाडीया यांनी एका आरोग्य केंद्रात सिरींजमध्ये इंजेक्शन भरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे

कामरेज- कामरेजमधील पाचवी नापास भाजप आमदार व्ही. डी. झालावाडीया यांनी एका आरोग्य केंद्रात सिरींजमध्ये इंजेक्शन भरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.आपण कुणालाही इंजेक्शन दिले नाही, केवळ रुग्णांची सेवा करीत आहोत आणि दोनशेहून जास्त रुग्ण बरे करून उत्तम स्थितीत घरी पाठविले असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे काँग्रेसने या आमदाराचा पुतळा रुग्णालयात उभारण्यात यावा अशा शब्दांत टीका केली. (gujarat bjp mla vd jhalawadiya covid hospital siring injection)

सार्थना कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. सुरत महापिलेकेच्या सहकार्याने ते चालविले जाते. झालावाडीया यांनी सांगितले की, गेली चाळीस दिवस मी हा केंद्रात स्वयंसेवी कार्य करतो आहे. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही. मी फक्त रेमडेसिव्हीर डोस सिरींजमध्ये भरला, पण कुणालाही इंजेक्शन टोचले नाही. मी सिरींज भरत असताना जवळपास १०-१५ डॉक्टर उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसने टीका केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आता आमदार महोदयांकडूनच प्रशिक्षण घ्यावे, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते जयराज सिंह यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

SCROLL FOR NEXT