CBI esakal
देश

मोदींच्या गुजरातमध्ये CBI ची छापेमारी; 114 कोटींची बँक फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

सीबीआयनं गुजरातमधील तांदूळ कंपनीविरोधात फसवणुकीसंदर्भात एफआयआर नोंदवला आहे.

गुजरात : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं (सीबीआय) गुजरातमधील तांदूळ कंपनीविरोधात फसवणुकीसंदर्भात एफआयआर नोंदवलाय. ज्यामध्ये आरोपींनी तीन बँकांची 114.06 कोटी रुपयांची फसवणूक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून सीबीआयनं नडियादमधील श्री जलाराम राईस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि संचालक जयेश त्रिभुवनदास गणात्रा व बिपिन त्रिभुवनदास गणात्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

2010 ते 2015 दरम्यान त्यांनी ही फसवणूक केलीय. एफआयआरमध्ये म्हटलंय, की आरोपींना बँकिंग कन्सोर्टियमअंतर्गत विविध कर्ज सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच कर्ज घेणार्‍या कंपनीनं बँकांना कर्ज सुविधा मंजूर करण्यासाठी खोटे बुक लोन दाखविल्याचा आरोपही करण्यात आलाय.

कर्जदार कंपनीनं कर्जाच्या रकमेचा गैरवापर केला असून यामुळं बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचं 114.06 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालंय. सीबीआयनं सांगितलं, की गुजरातमधील अहमदाबाद, नडियाद, बावला यासह सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आलीय. तिथून दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT