gujarat congress spokesperson arrested bjp graffiti altercation latest Marathi news  
देश

भिंतीवरील भाजपच्या 'फिर एक बार मोदी सरकार' घोषणेची खाडाखोड, काँग्रेस नेत्याला अटक

गुजरात सायबर क्राईम पोलिसांनी अहमदाबाद येथे काँग्रेसचे प्रवक्ते अमित नायक यांना अटक केली आहे.

रोहित कणसे

गुजरात सायबर क्राईम पोलिसांनी अहमदाबाद येथे काँग्रेसचे प्रवक्ते अमित नायक यांना अटक केली आहे. भिंतीवर लिहिलेल्या भाजपच्या स्लोगनशी छेडछाड करून त्याचा व्हिडिओ बनवून तो शेअर केल्याचा नायक यांच्यावर आरोप आहे. भाजपचे प्रचार आणि संपर्क समन्वयक अभय शाह यांच्या तक्रारीवरून गुजरात पोलिसांच्या सायबर क्राईमने ही कारवाई केली आहे.

अभय शाह यांनी 29 जानेवारी रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पक्षाच्या घोषवाक्याचा विपर्यास करणारा नायक यांचा व्हिडिओ पाहिला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर वॉल पेंटिंग केल्या आहेत. यामध्ये पक्षाने ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ (फिर एक बार मोदी सरकार) असे लिहीत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

सायबर क्राईम पोलिसांकडे दाखल केलेल्या अधिकृत तक्रारीत शाह यांनी नायक यांच्या या कृत्यामुळे परिसरात अशांतता निर्माण होऊ शकते असा उल्लेख केला आहेत . शाह यांनी आरोप केला आहे की त्यांनी नायक यांना सोशल मीडियावरून पोस्ट काढून टाकण्याची विनंती केली होती, परंतु तरीही नायक यांनी धमकी देत तो व्हिडिओ डिलीट करण्यास नकार दिला. या वादानंतर शाह यांनी सायबर क्राईम अधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

नायक यांच्या विरुद्ध कलम 153 (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), कलम 290 (सार्वजनिक उपद्रव) आणि कलम 506(1) ( धमकावणे) यासह नायक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

या घटनेमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. अहमदाबाद शहर काँग्रेसचे प्रमुख हिम्मत सिंग पटेल हेही नायक यांनी केलेल्या कृत्याशी सहमत नसल्याचे समोर आले आहे. पटेल यांनी नायक यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. गुजरातमधील पक्षाच्या टीव्ही मीडिया पॅनेलमध्ये अमित नायक यांचा समावेश होतो. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांचे निकटवर्तीय मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

SCROLL FOR NEXT