Ahmedabad Serial Bomb Blast Case esakal
देश

बॉम्बस्फोट खटल्याचा 13 वर्षांनंतर निकाल; 28 आरोपींची निर्दोष मुक्तता

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता.

गुजरातमधील (Gujarat) एका न्यायालयानं (Gujarat Court) अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (2008) प्रकरणी 77 पैकी 10 आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. या प्रकरणात एकूण 49 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून 28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. 13 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी गेल्या वर्षी 3 सप्टेंबरमध्ये पूर्ण झाली. मात्र, विशेष न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. या प्रदीर्घ सुनावणीदरम्यान सरकारी पक्षानं 1100 साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

2008 मध्ये अहमदाबादमध्ये (2008 Ahmedabad Bombings) झालेल्या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 2009 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. विशेष न्यायाधीश एआर पटेल यांनी गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी संपल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी या खटल्याचा निकाल राखून ठेवला. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद शहरात 70 मिनिटांच्या अंतरानं एकूण 21 बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 200 लोक जखमी झाले होते.

इंडियन मुजाहिदीनशी (Indian Mujahideen) संबंधित लोकांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी (Gujarat Police) केलाय. 2002 मध्ये गोध्रा नंतरच्या दंगलीचा (Godhra Riots) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिदीननं हे स्फोट घडवून आणल्याचं आरोपांमध्ये म्हंटलंय. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांनी सुरतमध्ये विविध ठिकाणांहून बॉम्ब जप्त केले होते. यानंतर अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT