Gujarat election 2022 former bjp vice president pvs sharma resigns from bjp in surat may join aap  Sakal
देश

Gujarat Election: गुजरातमध्ये भाजपला गळती? सुरतमध्ये बड्या नेत्याने सोडली साथ

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सुरतमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सुरतमधील पक्षाचे माजी उपाध्यक्ष पीव्हीएस शर्मा यांनी मंगळवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांना लिहिलेल्या पत्रात पक्षात त्यांची उपेक्षा होत असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासालाही सामोरे जावे लागले होते. आयकर विभागात माजी सहाय्यक आयुक्त असलेले पीव्हीएस शर्मा यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला होता.

सुरत येथे व्यापाऱ्यांवर त्यांची पकड असल्याने ते भाजपसाठी अत्यंत उपयुक्त मानले जात होते. दरम्यान ते भाजपचा राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास भाजपच्या बालेकिल्ल्यात केजरीवाल अधिक मजबूत होऊ शकतात आणि त्यामुळे सुरतच्या 16 विधानसभा जागांवर भाजपच्या

नोटाबंदीमध्ये संबंध बिघडले

नोटाबंदीच्या काळात पीव्हीएस शर्मा यांचे भाजपसोबतचे संबंध बिघडले होते. त्यांच्याकडे व्यापारी नेता म्हणून पाहिले जात असल्याने ते नेहमी व्यापार्‍यांशी संबंधित समस्या मांडतात. नोटाबंदीच्या काळात व्यापार्‍यांचा त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांचे ट्विट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष्य करणारे असल्याचे मानले जात होते. या संबंधीत ट्विटनंतर पक्षाकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. नंतर त्यांना सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ED)च्या चौकशीलाही सामोरे जावे लागले.

गुजरात भाजपचे अध्यक्ष हे पक्षात सीआर पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते, मात्र त्यांनी आपल्या राजीनाम्यात पाटील यांच्या कार्यकाळात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. तपासादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनाही त्यांच्याशी संपर्क न ठेवण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे नुकसान होणार?

खरे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक प्रचार केला होता. पाटीदार आंदोलन आणि दलित आंदोलनाचाही त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये पक्षावर पराभवाचे संकट होते. मात्र अखेरच्या क्षणी नरेंद्र मोदींनी तीन दिवस आक्रमक प्रचार केला. या दरम्यान सुरतमध्ये 16 पैकी 15 जागांवर भाजपला यश मिळाले होते.

तरीही सुरतमधील भाजपची अडचण कमी झालेला नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी या भागात विजय मिळवून भाजपसाठी धोक्याचा इशारा दिलवा होता. स्थलांतरित कामगारांना मोफत वीज आणि पाणी देण्याची केजरीवाल यांची घोषणा त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. केजरीवाल यांना शर्मा यांची साथ मिळाली तरी भाजपच्या अडचणीत वाढ होईल, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT