Gujarat Election sakal
देश

Gujarat Election : काँग्रेसच्याच काळात वाढली गरिबी, मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप केला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत गरिबी मोठ्या प्रमाणावर वाढली कारण त्यांनी केवळ घोषणाबाजी केली आणि कोणतेही ठोस काम करण्याऐवजी देशाचे नुकसान केले आहे. पंतप्रधान गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली नगर येथे एका सभेला संबोधित करत होते, विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे...

मोदींनी आरोप केला की, “काँग्रेस गेली अनेक दशके फक्त एकच सांगत आहे – गरिबी हटवा. लोकांनी तुम्हाला ते करण्याची सत्ता दिली होती, पण त्यांनी केवळ घोषणाबाजी केली. फक्त आश्वासने दिली आणि जनतेची दिशाभूल केली. यामुळेच काँग्रेस सरकारच्या काळात गरिबी वाढली."

पंतप्रधान म्हणाले की, मागील काँग्रेस आघाडी सरकारच्या धोरणांमुळे गरीब नागरिक अर्थव्यवस्थेत कोणतीही भूमिका बजावू शकले नाहीत. काँग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले असले तरी गरिबांना बँक खाती उघडता आली नाहीत, असे ते म्हणाले. काँग्रेसने त्यांच्या सरकारच्या काळात शिक्षण, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रात गरीब, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायातील लोकांना प्राधान्य दिले नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानम म्हणाले, “द्रौपदी मुर्मू प्रत्येक आदिवासी कुटुंबाचा आणि प्रत्येक नागरिकाचा अभिमान आहे. मात्र काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यांना कोणत्याही आदिवासी महिलेला भारताचे राष्ट्रपती बनवायचे नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. अन्यथा त्यांची एकमताने निवड झाली असती.''

गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT