Eknath Shinde Amit Shah Sakal
देश

Gujarat Election Result 2022: "भाजपच्या विक्रमाला विजयाची नवी झालर"; CM शिंदेंनी केलं तोंडभरुन कौतुक

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार आहे. यामुळं भाजपचं मित्र पक्षांकडून अभिनंदन केलं जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाष्य केलं आहे. (Gujarat Election Result 2022 CM Eknath Shinde congratulates BJP says record break win)

"गेल्या २४ वर्षांत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्व विक्रम भाजपानं मोडलं आहेत. या निवडणुकीत जनतेनं भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचं आणि गुजरातच्या जनतेचं या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन" अशा शब्दांत गुजरातच्या निकालावर CM शिंदे यांनी भाजपच्या कौतुकाचं ट्विट केलं आहे.

दरम्यान, भाजपनं गुजरामध्ये १८२ जागांपैकी १५६ जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला १७, आपला ५ तर इतर पक्षांचा ४ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत ९२ या बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजप बरीच पुढे निघून गेली. त्यामुळं भाजपनं रेकॉर्डब्रेक कामगिरी करत गुजरातमध्ये एकहाती विजय मिळवला तर काँग्रेसची पुरती धुळधाण झाली. आपचा प्रचारही भाजपसमोर टिकू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT