Gujarat election shahi imam of jama masjid shabbir ahmed siddiqui has given controversial statement regarding muslim woman 
देश

Gujrat Election : 'मुस्लिम महिलांना तिकीट देणे हे…', जामा मशिदीचे शाही इमाम यांचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Shahi Imam Of Jama Masjid : मुस्लिम महिलांना निवडणुकीत तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांवर जामा मशिदीच्या शाही इमामाने हल्लाबोल केला आहे. ते म्हणतात की आपल्या धर्मात पुरुषांची कमतरता आहे का. गुजरातमध्ये अहमदाबाद येथील शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी मीडियाशी संवाद साधत होते.

गुजरातमध्ये सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. उद्या म्हणजेच 5 डिसेंबरला राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्याचवेळी अहमदाबादमधील जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी मतदानापूर्वी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम महिलांना तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांनी इस्लामविरोधी म्हटले आहे. यामुळे त्यांचा धर्म कमकुवत होत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

जामा मशिदीचे शाही इमाम काय म्हणाले..

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण झाला आहे. अहमदाबाद येथील जामा मशिदीच्या शाही इमामा यांनी मुस्लिम महिलांच्या राजकारणातील सहभागाचा निषेध केला आहे. मुस्लिम महिलांना निवडणुकीचे तिकीट देणे इस्लामच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. यातून ते धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकही माणूस शिल्लक नाही का? असा सवाल देखील शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी यावेळी केला आहे.

गुजरातमधील मुस्लिम मतांबाबत बोलताना ते म्हणाले होते की, राज्यातील मुस्लिम आणि गुजरातमध्ये कोणत्याही तीसऱ्या पक्षाला वाव नाही. आम आदमी पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले होते की, लोक आधीही आले, पण टिकले नाहीत. अशा स्थितीत तिसऱ्या पक्षामुळे तुम्ही काँग्रेसशी लढा घेतला असेल, तर ते योग्य नाही, भाजपसोबत तर आधीच आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT