Jignesh Mevani 
देश

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. मंगळवारी आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी मेवाणी यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान या प्रकरणात मेवाणी यांच्यावर आयपीसी कलम २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द उच्चारणे), ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३५३ (कर्तव्य पार पाडताना सार्वजनिक सेवकावर हल्ला करणे) आणि ३५४ (तिच्या विनयभंगाच्या उद्देशाने महिलेवर फौजदारी बळाचा वापर करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेवाणी यांच्या वकिलांनी ते उद्या बारपेटा येथील उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल करणार असल्याचे सांगितेल. तसेच आम्ही, आश्चर्यचकित झालो आहोत. तीन दिवस पोलिस कोठडीत असताना अधिकार्‍यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांना जामीन मिळाल्यानंतर अचानक पुन्हा अटक करण्यात आले आहे, असे मेवाणींचे वकील म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी सोमवारी जामीन मिळालेल्या दलित नेत्याला दुसऱ्या प्रकरणात लगेचच अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त आणि निंदनीय वक्तव्य केल्याचा आरोप आहे. पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यापूर्वीही मेवाणी यांनी काही वादग्रस्त ट्विट केले होते, ज्याची पोलिसांनी दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या ट्विटवरून आसाम भाजपच्या एका नेत्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मेवाणी यांना गुरुवारी गुजरातच्या पालनपूर येथून अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT