Rajkot Gaming Zone Fire Gujarat Esakal
देश

Rajkot Fire: गेमिंग झोनमधील आगीतील मृतदेहांची राख, ओळख पटवण्याचे आव्हान; मृतांचा आकडा 28 वर

Gaming Zone Fire: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने मुले आपल्या पालकांसोबत मजा करण्यासाठी टीआरपी गेम झोनमध्ये आली होती.

आशुतोष मसगौंडे

गुजरातमधील राजकोट शहरातील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत चार मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकोट पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर 'गेम झोन'चा मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

शनिवारी संध्याकाळी राजकोटच्या TRP 'गेम झोन' मध्ये लागलेल्या भीषण आगीत 12 वर्षाखालील चार मुलांसह एकूण 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राजकोटच्या सहाय्यक पोलिस आयुक्त राधिका भराई यांनी सांगितले की, 28 मृत्यूंची पुष्टी झाली आहे. मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने मुले आपल्या पालकांसोबत मजा करण्यासाठी टीआरपी गेम झोनमध्ये आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्ध्याहून अधिक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक टीआरपी गेम झोनच्या जळालेल्या अवशेषांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा नाना-मावा रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लहान मुलांसह अनेक लोक गेम खेळत होते.

दरम्यान गेम झोनला फायर एनओसी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर गेम झोनमध्ये अग्निशमन उपकरणांचाही अभाव होता.

या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT