देश

Gujarat youth Killed in Russia : मोठ्या पगारासाठी गुजराती तरुणानं गाठलं रशिया; युक्रेन युद्धाने घेतला जीव, 'इतका' मिळायचा पगार

Gujarat youth Killed in Russia Latest News : गुजरातचा रहिवासी असलेल्या हेमिल अश्विनभाई मुंगुकिया हा तरुणानं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं

रोहित कणसे

Gujarat youth Killed on Ukraine Front : गुजरातचा रहिवासी असलेल्या हेमिल अश्विनभाई मुंगुकिया हा तरुणानं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. परदेशात जाऊन नोकरी करून खूप पैसा कमवायचा असं त्यांचं स्वप्न होतं. याचसाठी तो रशियाला गेला अन् युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धात मारला गेला. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

हेमिलचे काकाअतुल मंगुकिया यांनी सांगितलं की, दोन दिवसांनंतर हेंमिलचा एअर स्ट्राइकमध्ये मृत्यू झाल्याची बातमी समजली. २३ फेब्रुवारी रोजी माझ्या भाऊ अश्विनभाई यांना हेमिलच्या मित्राचा फोन आला, जो त्याच्यासोबत काम करत होता. त्याने हेमिलच्या मृत्यूची बातमी दिली. पहिल्यांदा कुटुंबियांना या बातमीवर विश्वासच बलवा नाही, पण त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी तपास केला असता ही बातमी खरी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

१२वीच्या पुढे शिक्षण न घेतलेला हेमिल काही वर्षांपूर्वी आई-वडील आणि २१ वर्षीय भावासह सुरतच्या कामरेज तालुक्यातील वेलांजा गावात गेला होता. अतुलने सांगितले की, भावंडांमध्ये लहान असलेला हेमिल सध्या यूकेमध्ये शिकत होता.

मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी झालं होतं कुटुंबाशी बोलणं

अतुल यांनी सांगतलं की हेमिललाही पहिल्यापासूनच परदेशात जायचे होते. १४ डिसेंबर रोजी भारतातून चेन्नईमार्गे रशियाला रवाना झाला. घरच्यांना तो नियमित फोन करत असे. हेमिलचा त्याच्या कुटुंबाला झालेला शेवटचा कॉल दोन तासांपेक्षा जास्त वेळ सुरू होता. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी त्यांना फोन केला होता. तिथे सर्व काही चांगले सुरू होते. फोन कॉल केल्यानंतर काही तासांतच त्याची हत्या झाली यावर विश्वास बसणे अवघड जात असल्याचे अतुल यांनी सांगितले.

असा पोहचला रशियाला

हेमिलला सोशल मीडियावर रशियन सैन्य हेल्पर शोधत असल्याबद्दल माहिती मिळाली. त्याने एका रिक्रूटमेंट एजंटशी संपर्क साधला. सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो रशियाला पोहोचला. इथे त्याला चांगला पगार मिळत होता. हेमिलचे काका म्हणाले की, काही दिवसांपूर्वी हेमिलचा पहिला पगार २.३ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात आला होता. हेमिलचे कुटुंबाची इच्छा आहे की सरकारने हेमिलच्या मृत्यूबद्दलच्या स्पष्टतेसाठी रशियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

दरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हेमिल सामान्य व्हिसावर रशियाला गेला होता. तो रशियाला कसा पोहोचला आणि तिथे काम करू लागला याचा तपास आम्ही सुरू केला आहे. कुटुंब लगेच बोलू शकत नाही, म्हणून आम्ही वाट पाहत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT