PM Modi Emotional e sakal
देश

VIDEO : ''माझ्या वडिलांची समस्या...'', मुलगी रडायला लागताच PM मोदी भावूक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी गुजरातमधील सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी वातावरण अचानकच भावूक झाले होते. एका मुलीने चर्चेदरम्यान आपल्या वडिलांची परिस्थिती सांगितली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. त्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

एका अयुब पटेल नावाच्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या आजाराबद्दल पंतप्रधान मोदींना सांगितले. माझ्या डोळ्यांची दृष्टी खूपच कमी झाली आहे. मला ग्लुकोमा झाला आहे. आता हा आजार कमी होण्याची शक्यता नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं ती व्यक्ती पंतप्रधानांना सांगतेय. या घटनेचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी त्या व्यक्तीला विचारतात, मुलींना शिक्षण देता काय? त्यावर ती व्यक्ती म्हणतेय, होय मुली शिकतात आणि त्यांना सरकारी स्कॉलरशीप देखील मिळतेय. तुमच्या मुलींचं स्वप्न काय आहे? असं पंतप्रधानांनी विचारल्यानंतर ते सांगतात, की माझ्या मोठ्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे. आताच निकाल आला आहे. त्यावर पंतप्रधान म्हणतात, की तुमची मुलगी इथं उपस्थित आहे का? असेल तर तिला बोलायला सांगा.

मुलगी पंतप्रधान मोदींसोबत बोलताना तिला तिचं नाव विचारतात. त्यानंतर मुलगी आलिया पटेल, असं तिचं नाव सांगतेय. त्यानंतर पंतप्रधान विचारतात की, तुझ्या मनात डॉक्टर बनण्याचा विचार का आला? माझ्या वडिलांची डोळ्यांची समस्या पाहून हा विचार आला, असं म्हणताच मुलगी रडायला लागली. त्यानंतर ती भावूक झाली असून बोलू शकणार नाही, असं तिचे वडील अयुब पंतप्रधान मोदींना सांगतात. त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले. ते काही वेळासाठी स्तब्ध झाले. त्यानंतर काही वेळातच उपस्थितांनी त्या मुलीवर टाळ्यांचा वर्षाव केला.

वडिलांबाबत तुला जी आत्मीयता वाटते तीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे, असा सल्ला मोदींनी त्या मुलीला दिला. तसेच सर्वांनी कोरोनाची लस घेतली की नाही? याबाबत विचारपूस केली. तसेच ईद कशाप्रकारे साजरी केली? असंही मोदींनी विचारलं. मुलींना नवे कपडे आणि पैसे देऊन ईद साजरी केल्याचं अयुब पटेल यांनी मोदींना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: महाराष्ट्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; चार नवीन योजनांचा पाऊस, पण कोणत्या? जाणून घ्या...

Maharashtra Budget 2026: ''मध्ये-मध्ये बोलणाराचे पैसे कापणार'', भाषण सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा इशारा कोणाला?

सूर्यकुमार यादव 'बाबा' होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पत्नी देवीशाच्या 'त्या' व्हिडिओमुळे फॅन्समध्ये उत्सुकता

Latest Marathi News Live Update : ‘महाविस्तार-AI’ उपक्रमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित स्मार्ट मार्गदर्शन

Devendra Fadnavis Agriculture AI : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'महाविस्तार-एआय, शेतीत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच; फडणविसांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT