rape case  file photo
देश

गुजरात - पार्क केलेल्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

16 वर्षीय मुलीवर एका अल्पवयीनाने बसमध्ये बलात्कार केला. यावेळी त्याच्या दोन साथीदारांनी बाहेरून बसला लॉक लावलं होतं.

गांधीनगर - गुजरातमध्ये (Gujrat) अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याशेजारी उभा असलेल्या बसमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती बुधवारी दिली. वडोदरा (Vadodara) शहरात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २ जानेवारी रोजी रात्री उशिरा शहरातील न्यू व्हीआयपी रोड परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच त्याच्यासोबत असलेल्या दोघांचा शोध घेतला जात आहे.

हरनी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आदिवासी समाजातील १६ वर्षीय मुलीला अल्पवयीन मुख्य आरोपीसह दोन सहकाऱ्यांनी बसमध्ये खेचलं. फरार आरोपींनी मुलीला जबरदस्तीने बसमध्ये ओढण्यासाठी मुख्य आरोपीला मदत केली. त्यानंतर दोघेही बाहेर निघून गेले आणि बसला कुलुप घातलं. त्यानतंर अल्पवयीन आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

मुख्य आरोपीने मुलीला धमकी देत याबद्दल कोणतीही वाच्यता न करण्यास सांगितलं आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्याच्या दोन सहकाऱ्यांचा शोध सुरु असून त्यांचे वय मात्र पोलिसांनी सांगितलेलं नाही. घटनेनंतर पीडीत अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत मध्यप्रदेशात तिच्या मूळ गावी गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT