culprits arrested sakal media
देश

आंध्र प्रदेश : 'या' पक्षाच्या बड्या नेत्याच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक

नरेश शेंडे

आंध्र प्रदेश : येथील गुंटूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली होती. तेलगू देसम पक्षाच्या (Telugu Desam Party) एका बड्या नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. गुरुवारी आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात गुंडलापाडू येथे ही घटना घडली होती. थोटा चंद्रैया (Thota Chandraiah murder) असं हत्या झालेल्या नेत्याचं नाव आहे. या प्रकरणी गुंटूर ग्रामीण पोलीसांनी धडक कारवाई करत आठ जणांना (eight culprit arrested) आज शुक्रवारी अटक केलीय. या हत्या प्रकरणात युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात होता. चिंथा शिवरामैया असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Guntur Police arrested eight culprits in Telugu Desam Party Thota Chandraiah murder case)

थोटा चंद्रैया यांची हत्या झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. चंद्रैया यांच्या अंत्यसंस्कारातही नायडू यांनी उपस्थिती दर्शवत शोक व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी तातडीनं दखल घेत आरोपींना गजाआड करण्यासाठी त्यांनी चार विशेष पथकं तयार केली. तेलगू देसमचे चंद्रैया आणि युवजन श्रमिक रायथू कांग्रेस पक्षाचा कार्यकर्ता चिंथा शिवरामैया यांच्यात रस्त्याच्या बांधकामावरुन वाद होता. अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय.

चिंथा शिवरामैया यांची हत्या करण्याचा चंद्रैया यांचा कट असल्याची खबर चिंथाला त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. " 13 जानेवारीला थोटा चंद्रैया यांना आरोपींनी त्यांच्या गावात पाहिलं. त्यानंतर हल्लेखोरांनी चंद्रैया यांच्यावर दगडाने, काठ्यांनी आणि चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली." अशी माहिती पोलीस अधिक्षक विशाल गुन्नी यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT