gurmeet ram rahim 
देश

Gurmeet Ram Rahim: बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमचा पॅरोल अर्ज मंजूर

सकाळ डिजिटल टीम

चंदीडगड : हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा ४० दिवसांचा पॅरोल अर्ज स्वीकारण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. (gurmeet ram rahim singh news in Marathi)

आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आदमपूर पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी, डेरा प्रमुखाला जूनमध्ये एक महिन्याच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते आणि फेब्रुवारीमध्ये त्याला तीन आठवड्यांची रजा देण्यात आली होती.

सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. पंचकुला येथील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये त्याला दोषी ठरवले होते.

2002 मध्ये डेरा मॅनेजर रणजित सिंग यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल गुरमीत राम रहीमला इतर चार जणांसह गेल्या वर्षी दोषी ठरवण्यात आले होते. या व्यतिरिक्त डेरा प्रमुख आणि इतर तिघांना 2019 मध्ये 16 वर्षांपूर्वी केलेल्या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajpal Yadav Surrender : राजपाल यादवचं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण! ; ‘चेक बाउन्स’ प्रकरणी न्यायालयाने दिला होता अल्टिमेटम

Pune Crime: फ्लॅटमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, बनावट ग्राहकांच्या मदतीने पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Latest Marathi News Live Update: जुन्नरमध्ये एका आरोपीवर 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई

Naseeruddin Shah: 'प्रशंसा न करणं म्हणजे देशद्रोह...'! नसीरुद्दीन शाहांचा सरकारवर हल्लाबोल; ‘१९८४’ची आठवण गिरवली, काय म्हणाले?

OTT वर आणखी एक कोर्टरूम ड्रामा; ‘अमर विश्वास’चा ट्रेलर प्रसिद्ध; मुख्य भूमिकेत झळकणार हे अभिनेते

SCROLL FOR NEXT