cbi esakal
देश

बँक घोटाळा प्रकरण | माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला CBI कडून अटक

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : सुमारे नऊ लाखांचे कर्ज न फेडल्याच्या २५ वर्षे जुन्या प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. वारंवार समन्स बजावूनही तो न्यायालयात हजर न झाल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज न्यायालयात हजेरी

बँक कर्ज फसवणुकीच्या जुन्या प्रकरणात आसामचे माजी मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांचा मुलगा अशोक सैकिया याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. या बाबत खटला 1996 मध्ये नोंदवण्यात आला होता. अशोक सैकियाला सोमवारी (आज) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत विचारले असता त्यांचा मोठा भाऊ आणि आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया यांनी सांगितले की, अशोक सैकिया यांना काल (ता.७) संध्याकाळी सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्यासोबत नेले.

व्यवसायाने व्यापारी असलेल्या अशोक सैकिया यांनी त्यांच्या मोठ्या भावामार्फत एक निवेदन जारी करून सांगितले की, त्यांनी 1996 मध्ये आसाम राज्य सहकारी आणि ग्रामीण विकास बँक लिमिटेड (ASCARD) कडून कर्ज घेतले होते. ते म्हणाले, “नंतर 2011 मध्ये मी ASCARD पत्रानुसार कर्जाची परतफेड केली होती. बँकेच्या प्रभारी महाव्यवस्थापकांनी 28 ऑक्टोबर 2015 च्या अधिकृत पत्राद्वारे सांगितले की, कोणतीही थकबाकी नाही. सीबीआयचे पथक अचानक आमच्या घरी आले आणि म्हणाले की माझे कर्ज थकीत आहे. मला सीबीआय किंवा कोर्टाकडून कोणतीही नोटीस मिळाली नाही.

एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी सीबीआयचा “वापर” करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT