Demand for making Nirmohi Akhada a party  Demand for making Nirmohi Akhada a party
देश

आणखी दोन याचिका दाखल; निर्मोही आखाड्याची पक्षकार बनवण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi case) प्रकरणात सुनावणी सुरू आहे. मुस्लीम पक्ष आपली बाजू मांडत आहे. आता जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात आणखी दोन याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये एकात पक्ष बनवण्याची तर दुसऱ्यात पक्ष बनवण्यासह शृंगार गौरीच्या पूजेची मागणी करण्यात आली आहे. ही निर्मोही आखाड्याने याचिका दाखल केली आहे. दुसरी याचिका वडमित्र विजय शंकर रस्तोगी यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. (Demand for making Nirmohi Akhada a party)

विजय शंकर रस्तोगी यांच्या वतीने शृंगार गौरी प्रकरणाच्या कायदेशीरतेच्या सुनावणीत पक्षकार होण्यासाठी अर्ज दाखल (petitions) करण्यात आला आहे. १९९१ पासून सुरू असलेल्या मूळ खटल्यात वादी असल्याने या खटल्यात पक्षकार होणे माझे कर्तव्य आहे, असे विजय शंकर सांगतात. दुसरीकडे निर्मोही आखाड्याने याचिका दाखल केली आहे. मंदिरातील दैनंदिन दर्शन आणि हिंदूंच्या अधिकाराबाबत ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत निर्मोही आखाड्याला पक्षकार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. अयोध्या राममंदिरातही निर्मोही आखाड्याची महत्त्वाची भूमिका होती.

फिर्यादी जितेंद्र सिंग विषेंच्या वतीने पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल विशेष सीजेएमच्या न्यायालयात १५६(३) अन्वये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी झाली आणि सायंकाळपर्यंत त्यावर आदेश येऊ शकतो. एसीजेएम-पंचम कोर्टात कलम १५६(३) अन्वये अधिवक्ता हरिशंकर पांडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर, मुस्लीम पक्षाच्या वतीने बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सहअध्यक्ष श्रीनाथ त्रिपाठी यांनी याचिका फेटाळण्यासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने पत्रासह अर्ज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. २ जून रोजी सुनावणी होणार आहे.

दुपारी ४ वाजेपर्यंत मुस्लिमांना प्रवेश बंदीचा निर्णय

दिवाणी न्यायाधीश फास्ट ट्रॅक कोर्टात किरण सिंह विसेन यांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा निर्णय दुपारी ४ वाजता येईल. किरण सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत ज्ञानवापीमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची आणि पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुस्लीम बाजूच्या वकिलांनी फिर्यादीची प्रत न देण्याबाबत न्यायालयाला कळवले आहे. सुनावणीसाठी वेळ मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT