Gyanvapi Masjid Survey esakal
देश

ज्ञानवापी मशिदीत आणखी एक 'शिवलिंग'? काशी विश्वनाथ मंदिरातील महंतांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत.

वाराणसीच्या (Varanasi) ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर (Gyanvapi Masjid Survey) अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पाहणी अहवालात ज्ञानवापी मशिदीत कमळ, सापाची फणा आणि अनेक प्रकारच्या हिंदू खुणा आढळून आल्याचंही म्हटलंय. तर, दुसरीकडं सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांनी करावी, असं म्हटलंय. आता याप्रकरणी पुढील सुनावणीपूर्वी काशी विश्वनाथ मंदिरानं (Kashi Vishwanath Temple) मोठा दावा केलाय. मशिदीच्या तळमजल्यावर दुसरं शिवलिंग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सोमवारपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार असून वाराणसी जिल्हा न्यायालयात (Varanasi District Court) चार याचिकांवर सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार, जिल्हा न्यायाधीशांनी आठ आठवड्यात ज्ञानवापी वादावर निकाल द्यायचा आहे. दरम्यान, इथं आणखी एक शिवलिंग असल्याचा दावा काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी केलाय. 154 वर्षे जुनं चित्र दाखवत ते म्हणाले, लोक भगवान नंदीजवळ बसायचे. जवळच एक दरवाजा होता, तिथं शिवलिंग आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

शिवलिंगाच्या पूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. व्ही. सी. तिवारी यांनी केलीय. ते म्हणाले, 'शिवलिंगाची पूजा करणं ही महंतांची जबाबदारी आहे. खाली शिवलिंग आहे, असा मी आत्मविश्वासानं दावा करतो. खालच्या शिवलिंगाची पूजा 1992 पासून बंद आहे, ती सुरू करावी. भक्तांना जाऊ द्यावं, असं माझं म्हणणं नाहीय. पण, ज्या पूजेसाठी मी याचिका दाखल करत आहे, त्यासाठी आम्हाला परवानगी मिळायला हवी.'

याप्रकरणी बनारसचे मुफ्ती अब्दुल्ला बातिन नोमानी म्हणाले, हे शिवलिंग एक कारंजे आहे. कारंजे तिथं होतं आणि ते वापरात होते. आजही तिथं कारंजा फिरताना पाहण्यासाठी लोक उपस्थित असतात. ते साक्ष देऊ शकतात. या पाहणीत सहभागी असलेल्या छायाचित्रकारानंही तिथं जी विहीर होती, ती वाळूखान्यात बुडाल्याचं सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: परदेशातून येतोय भारताचा खजिना; 64 टन सोनं देशात, नेमकं काय घडलं?

World Cup 2025: W,W,W... सेमीफायनलमध्ये ड्रामा! इंग्लंडने शून्यावर गमावल्या तीन विकेट्स, द. आफ्रिकेची धारदार गोलंदाजी; पाहा Video

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरुन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT