ज्ञानवापी मशीद  Esakal
देश

Gyanvapi Masjid Survey:ज्ञानवापी मशीदीबद्दल ४०० वर्षांपासून कोणताही वाद नव्हता, मुस्लिम संघटनांनी असा केला युक्तीवाद

Supreme Court Stay order on Gyanvapi Survey: ज्ञानवापी मशीदीच्या सर्वेला स्थगिती, मुस्लिम संघटना हाय कोर्टात न जाता थेट सुप्रिम कोर्टात

सकाळ डिजिटल टीम

Gyanvapi Masjid Survey:ज्ञानवापी मशीदीवर देशभरातील हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या दाव्यांवर देशभरात वाद सुरु आहे. शुक्रवारी (दि.२१ जुलै) एका हिंदू संघटनेच्या अर्जाला अनुसरुन वाराणसी जिल्हा न्यायालयाने ASIला मशीदीचा सर्वे करण्याची मंजूरी दिली होती.

सोमवारी (दि.२४ जुलै) सकाळी हा सर्वे सुरु झाला होता, पण मुस्लिम संघटनेच्या याचिकेवरुन सुप्रिम कोर्टाने या सर्वेला अंतरिम स्थगिती दिली आहे. आता बुधवारी (दि.२६ जुलै)संध्याकाळी ५ पर्यंत सर्वे होणार नाही.

या निर्णयाला स्थगिती देताना सुप्रिम कोर्ट म्हणालं की शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने सर्वेला मंजूरी दिली आणि सोमवारी हा सर्वे सुरुही झाला. मुस्लिम गटाला अपील करण्यासाठी संधी तरी मिळायला हवी होती. न्यायालयाने या प्रकरणात मुस्लिम गटाला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. सुप्रिम कोर्टामध्ये या आदेशावर दोन्ही बाजूंकडून चांगला युक्तीवाद सादर करण्यात आला होता.

हुजेफा अहमदी यांनी सांगितलं की जोपर्यंत उच्च न्याय़ालय पूर्ण गोष्टीची सुनावणी करत नाही, तोपर्यंत सर्वेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सुप्रिम कोर्टाने विचारलं की सध्या सर्वेची काय स्थिती आहे.

यावर तुषार मेहता यांनी उत्तर दिलं की सर्वेसाठी आतापर्यंत एक विटही हटवण्यात आलेली नाही. वैज्ञानिक पद्धतीने सर्वे केला जात आहे. फोटोग्राफी आणि दुसरे काही पर्याय वापरले जात आहेत. (Latest Marathi News)

खोदकामाची कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. या सर्वेवर न्यायालयाने सर्वेच्या सर्व प्रक्रियांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर कोर्टाने उच्च न्यायालयाला बुधवारपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करुन घ्यावी, जेणेकरुन या सर्वेवर अंतिम निर्णय घेता येईल.

शुक्रवारी वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने मोठी निर्णय देत ज्ञानवापी मशीदीच्या सर्वेचे आदेश दिले होते. कोर्टाने यावेळी सांगितलं होत की एक वैज्ञानिक सर्वे व्हायला पाहिजे, ज्यातून समजेल की मशीद मंदिरावर बांधण्यात आली आहे की नाही. या निर्णयाविरुद्ध मुस्लिम संघटनांनी सरळ सुप्रिम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला.

सुप्रिम कोर्टाने त्यांना हेही विचारलं की तुम्ही उच्च न्यायालयात जाण्याऐवजी तु्म्ही इकडे का आलात. यावर मुस्लिम संघटनांनी सांगितलं की आमच्याजवळ वेळ कमी होता आणि सर्वेचं काम सुरु करण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही स्थगितीच्या मागणीसाठी सरळ इकडे आलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT