Azadi ka amrit mahotsav indian flag 
देश

अवघा देश झाला तिरंगामय

‘हर घर तिरंगा’ ला उत्साहात प्रारंभ : ‘अमृत’ सोहळ्यासाठी लाल किल्ला सजला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऐतिहासिक अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला आज देशभर मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. ‘गल्ली ते दिल्ली’ असा तिरंगी माहौल पाहायला मिळाला. अनेकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावित त्याला मानवंदनाही दिली.

विविध ठिकाणांवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. राज्यामध्येही तिरंगा रॅलीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आबाल वृद्धांपासून सगळेजण यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा खास बनविण्यासाठी प्रशासनाबरोबरच दिल्ली पोलिस व सुरक्षा दलांनीही जोरदार तयारी केली आहे. संसद भवन व राष्ट्रपती भवनासह महत्त्वाच्या परिसरात ठिकठिकाणी सशस्त्र पोलिसांचा पहाराआहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. दिल्ली गेटपासून चांदनी चौक, दरियागंज, जामा मशीद या संपूर्ण परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. लाल किल्ला ते शीशगंज गुरुद्वारा व गौरीशंकर मंदिरापासून फतेहपुरी मशिदीपर्यंत कडक पहारा असेल. किल्ल्यालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील शुक्रवार बाजार, अजमेरी गेट भागातील बाजार, गालिब इन्स्टिट्यूट परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

पंतप्रधानांसाठी सातपदरी सुरक्षा

लाल किल्ला परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी सात पदरी सुरक्षा व्यवस्था असेल व त्याचीही रंगीत तालीम (मॉक ड्रील) करण्यात आली. पोलिस, निमलष्करी दले व लष्कराचे हजारो जवान, हवाई दल व लष्कराच्या यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. लाल किल्ल्यावरील झेंडावंदन व मोदी यांचे भाषण, या कार्यक्रमास शालेय मुलांसह ७ हजार विशेष आमंत्रितांना विशिष्ट टॅगसह आमंत्रण पत्रे पाठविण्यात आली आहेत.

लालकिल्ला परिसरात या वस्तू नेण्यास मज्जाव

जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, रिमोट कंट्रोल्ड कारच्या चाव्या, सिगारेटचे लायटर, ब्रीफकेस, हॅंडबॅग, कॅमेरे, दुर्बिणी आणि छत्र्या

असाही बंदोबस्त

  • अँटीड्रोन सिस्टिम आणि अन्य यंत्रणाही तैनात

  • लाल किल्ल्याभोवती हाय रिझॉल्यूशन कॅमेरे

  • किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एफआरएस यंत्रणा

  • दिल्ली शहर- परिसरामध्ये कलम- १४४ लागू

संघाच्या प्रोफाईलमध्ये राष्ट्रध्वज

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी विविध सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल पिक्चरमध्ये बदल करत भगव्या झेड्याऐवजी त्या ठिकाणी तिरंगा हा राष्ट्रध्वज ठेवला. याच मुद्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठविली होती.संघाने यावर स्पष्टीकरण देतानाच आमचे स्वयंसेवक हे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचे म्हटले होते.

यंत्रणा सज्ज

  • ७ हजार विशेष निमंत्रित

  • १० हजार पोलिस तैनात

  • ४०० काईट कॅचर तैनात

  • ५ किमी नो काईट फ्लाईट झोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; जनता वसाहत टीडीआर प्रकरणाला शासनाची स्थगिती

Miraj Minor Ganja : झटपट पैसे मिळवण्याचा नाद बेक्कार! मिसरुट न फुटलेली पोरंही गांजा विकताहेत; मिरजेत अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त

Umesh Patil: स्वबळ ठरलेच तर शिवसेनेसह इतरांना सोबत घेऊ: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील; सामान्य नागरिक, कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतच..

Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री; जमीन व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास होण्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार संकटात? 'नोव्हेंबर क्रांती'च्या चर्चांना वेग, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

SCROLL FOR NEXT