Hardik Patel Resigns From Congress 
देश

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का, मोदींचं कौतुक करत हार्दिक पटेलचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून कॉंग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. यानंतर पटेल पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे. (Hardik Patel Resigns From Congress state president)

आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाbलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं आहे.

हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कामाची स्तुती करत काँग्रेस पक्षावर सार्वजनिक टीका केली होती. पटेल हे मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस (Congress) च्या नेतृ्त्वाबद्दल नाराजी व्यक्त करत होते. या दरम्यान वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता पटेल यांची नाराजगी कॉंग्रेसला महाग पडू शकते.

हार्दिक काँग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करत भाजपचे कौतुक केलं होतं. त्यानंतर आता राजीनामा देत पटेल यांनी नवा राजकीय मार्ग शोधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT