Harish Salve India's Top Lawyer : esakal
देश

Harish Salve India's Top Lawyer : हरीश साळवे एका केससाठी किती फी घेतात माहितीये?

हरिश साळवे हे भारतातील सर्वाधिक महागडे आणि चर्चेतील वकील म्हणून साळवे यांचे नाव घेतले जाते.

युगंधर ताजणे

Harish Salve India's Top Lawyer : भारताचे माजी जनरल सॉलिसीटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नाची बातमी माध्यमांमध्ये आली आणि वेगवेगळया चर्चांना सुरुवात झाली आहे. लंडनमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी उद्योगविश्वातील वेगवेगळे मान्यवर उपस्थित होते.

हरिश साळवे हे भारतातील सर्वाधिक महागडे आणि चर्चेतील वकील म्हणून साळवे यांचे नाव घेतले जाते. जगभरामध्ये देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून हरिश साळवे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या हिट अँड रन केसचे वकीलपत्र घेतले होते. त्यानंतर कुलभुषण जाधवच्या याचिकेचे काम पाहिले होते. आता साळवे एका वेगळयाच कारणासाठी चर्चेत आले आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

साळवे यांचे तिसरे लग्न सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा विषय आहे. त्यात साळवे यांच्या वेगवेगळया आठवणींना उजाळा दिला जात आहे. साळवे यांच्या केसेस, ते घेत असलेली फी, कोर्टातील त्यांचा दरारा, त्यांचा अभ्यास, त्यांची विद्वता आणि आदर याविषयी नेटकरी चर्चा करत असताना भारतातील सर्वाधिक महागडा वकील म्हणून साळवे यांच्या नावाचा समावेश आहे.

वयाच्या सत्तरीपर्यत गेलेल्या साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. असं म्हटलं जातं की, साळवी हे एका केससाठी लाखो रुपये घेतात. मात्र एका केसमध्ये त्यांनी चक्क एक रुपया फी घेतली होती. आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये साळवे यांनी पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक आणि तितक्याच अभ्यासुपणे आपली बाजू मांडली होती. कुलभुषणची बाजू मांडण्यासाठी साळवे यांनी एक रुपया फी घेतली होती.

१९९९ ते २००२ पर्यत साळवे हे भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्यांनी आयसीजेमध्ये कुलभुषण जाधव यांची केस लढवली होती. एकीकडे पाकिस्ताननं जाधव यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी आपल्या वकीलावर वीस कोटी रुपये खर्च केले दुसरीकडे साळवे यांनी फक्त एक रुपया घेऊन ती केस पाहिली होती. बिझनेस टुडेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका बातमीनुसार साळवे किती फी घेतात हे सांगण्यात आले आहे.

साळवे हे त्यांच्या एका केससाठी सहा ते पंधरा लाख रुपये फी घेत असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे साळवे यांची भारतातील सर्वाधिक महागड्या वकीलांमध्ये नोंद होते. साळवे यांनी त्यांच्या करिअरमधील पहिली केस दिलीप कुमार यांची घेतली होती.त्यात हरिश यांनी त्यांच्या वडिलांना असिस्ट केले होते. दिलीप कुमार यांच्यावर काळेधन लपविल्याचा आरोप करण्यात आला होता.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT