Haryana esakal
देश

चारित्र्याच्या संशयावरून मायलेकींसह तिघांची गोळी घालून हत्या

सकाळ डिजिटल टीम

हरियाणाच्या (Haryana) फरिदाबाद जिल्ह्यात आज एक हृदयद्रावक घटना घडलीय.

फरीदाबाद : हरियाणाच्या (Haryana) फरीदाबाद जिल्ह्यात आज एक हृदयद्रावक घटना घडलीय. जिल्ह्यातील गोठडा मोहब्बताबाद (Gothda Mohbtabad) गावात तीन जणांच्या हत्येमुळं खळबळ उडाली असून रात्री घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, या हत्येनंतर पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. ह्या हल्ल्यात राजन, सुमन आणि आयेशा यांचा मृत्यू झालाय, तर गगन हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धौज पोलीस स्टेशन परिसरातील गोठडा मोहब्बताबाद गावात भाड्याने राहणाऱ्या एका पुरुष आणि दोन महिलांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. या गोळीबारात एक लहान मुलगाही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे 3 : 15 च्या सुमारास घडलीय. ज्यात दोन महिलांसह एका व्यक्तीला गोळी लागलीय. प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी याला दुजोरा दिलाय. फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी पोहोचून सर्व पुरावे गोळा केले असून पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब नोंदवून तपास सुरू केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT