supreme court  sakal
देश

खासगी क्षेत्रात आरक्षणाला स्थगितीविरोधात हरयाणा सरकार सुप्रीम कोर्टात

सकाळ डिजिटल टीम

खासगी क्षेत्रात स्थानिकांना ७५ टक्के आरक्षणाच्या हरयाणा सरकारच्या निर्णयाला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

खासगी क्षेत्रात स्थानिकांना ७५ टक्के आरक्षणाच्या हरयाणा (Haryana) सरकारच्या निर्णयाला पंजाब (Punjab) आणि हरयाणा उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. याविरोधात आता हरयाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. नवा कायदा मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी तरुणांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं होतं. तसंच यामुळं हजारो युवकांसाठी नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण होतील असंही ते म्हणाले होते.

हरयाणा उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानतंर आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानतंर हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात जात आहे. यामध्ये कायदेशीर कारवाई आम्ही करू. उद्योगपतींच्या शंका आणि अडचणींसाठी पर्यायी तरतूदी कायद्यात आहेत. हा पूर्णपणे संविधानानुसार संशोधित कायदा आहे. हरयाणा सरकारचा स्थानिक रोजगार कायदा न्यायालयीन प्रक्रियेतही यशस्वीपणे सर्व अडथळ्यांवर मात करेल असा विश्वास चौटाला यांनी व्यक्त केला.

स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणाऱ्या या नव्या कायद्याला फरीदाबाद इंडस्ट्रिज असोसिएशन आणि इतरांनी आक्षेप घेतला होता. हरयाणातून उद्योग धंदे बाहेर जातील अशी भीतीही व्यक्त केली होती. आरक्षित क्षेत्रातून नोकरीसाठी तरुणांची निवड करणं उद्योगासाठी प्रतिकूल ठरेल असंही म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT