Cold Drink Google
देश

दारु पिणे आणि खरेदी-विक्रीसाठी वय २५ वरून २१ वर्षे; हरयाणाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीनंतर हरयाणा सरकारनेसुद्धा दारु पिणे आणि खरेदी-विक्रीचे वय कमी केलं आहे.

दिल्लीनंतर (Delhi) हरयाणा (Haryana) सरकारनेसुद्धा दारु पिणे आणि खरेदी-विक्रीचे वय कमी केलं आहे. याआधी हरयाणात हे वय २५ वर्षे होतं ते कमी करून २१ असं करण्यात आलं आहे. हरयाणा सरकारने बुधवारी त्यांच्या महसूल अधिनियमात सुधारणा केली. यानुसार राज्यात दारु पिण्याचं, खरेदी-विक्रीसाठी कायदेशीर वय २५ वर्षांवरून २१ वर्षे करण्याचा निर्णय़ घेतला.

हरयाणा महसूल (संशोधित) विधेयक,२०२१ राज्याच्या विधानसभेत मंजूर कऱण्यात आले. विधेयकात दिल्लीने नुकतंच वय कमी केल्याचा दाखला देण्यात आला आहे. त्यानुसारच हरयाणातही वय कमी करण्याचा निर्णय घेतला.

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. प्रस्ताव मांडताना त्यांनी म्हटलं की, सध्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थिती मोठा बदल झाला आहे. जेव्हा जुने नियम, तरतुदी बनवल्या होत्या तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. लोक आता शिकले असून दारु पिण्यासंदर्भात ते जबाबदारीने योग्य असा निर्णय़ही घेऊ शकतात.

दरम्यान, कलम २९ नुसार २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने दारु खरेदी किंवा विक्री केल्यास त्याचा परवाना रद्द कऱण्याची तरतूद होती. याशिवाय इतर शिक्षेसह ५० हजार रुपयांचा दंडही होता. आता हीच शिक्षा २१ वर्षांखालील व्यक्तीने दारु प्यायल्यास किंवा खरेदी-विक्री केल्यास लागू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT