Suicide  sakal media
देश

पती-पत्नीची आत्महत्या; गळफास घेण्याआधी ३ मुलांना पाजलं विष

सकाळ डिजिटल टीम

कुटुंब प्रमुखाला सकाळी पाच जणांचे मृतदेह घरात दिसताच मोठा धक्का बसला.

हरयाणातील पलवल जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावात ही घटना घडली असून घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट आढळलेली नाही. मात्र शेजाऱ्यांनी हे कौटुंबिक वादातून झाल असेल असं म्हटलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी तीन मुलांना विष देऊन मारलं. मंगळवारी रात्री पती पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री दोघांनी मुलांना आधी विष दिलं त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

कुटुंब प्रमुखाला सकाळी पाच जणांचे मृतदेह घरात दिसताच मोठा धक्का बसला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये नरेश (वय ३३) पत्नी आरती (वय ३०) यांच्यासह सात वर्षांचा मुलगा, ९ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांच्या पुतणीचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Pune Accident : पुणे नवले पुलासारखा अपघात कोल्हापुरात; सायबर चौकात ५ वाहनांची भीषण धडक, नियंत्रणासाठी उपाययोजना होणार का?

Viral Video: जर तुमचे मूलंही ऑटोने शाळेत जात असेल तर वेळीच व्हा सावध, व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Mumbai : संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वन अधिकाऱ्यांची दारू पार्टी, व्हिडीओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश

Pune Weather : पुण्यात थंडीचा कडाका वाढला, येलो अलर्ट जारी; पुढील तीन दिवस कसे असेल हवामान?

Maratha Reservation: 'कुणबी दाखल्यांबाबत प्रशासनाची उदासीनता'; कऱ्हाड, पाटणच्या मराठा समन्वयकांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट !

SCROLL FOR NEXT