esakal

देश

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

Major bus and milk tanker collision : जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे, जाणून घ्या कुठं घडली घटना?

Mayur Ratnaparkhe

Hathras Bus Accident and Milk Tanker Accident : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात बुधवारी एक भीषण अपघात झाला. सासनी पोलीस स्टेशन परिसरातील सममाई गावाजवळ रोडवेज बस आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे दबला गेला आणि अनेक प्रवासी आत अडकले.

या भीषण दुर्घटनेत १४ वर्षांच्या मुलासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात झालेला दिसताच स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले.

सर्व जखमींना उपचारासाठी सासनी सीएचसी आणि जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.

जिल्हा दंडाधिकारी अतुल बत्स यांनी अपघाताची पुष्टी केली असून, दुचाकीस्वारास वाचवण्याचा प्रयत्न करताना बस चालकाने नियंत्रण गमावले आणि त्यामुळे बस टँकरला धडकली असे सांगितले. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत आणि तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : 1st ball, 1st wicket! जसप्रीत बुमराहच्या भन्नाट चेंडूवर टीम सेइफर्टचा उडाला त्रिफळा, Video पाहून थक्क व्हाल

Pune Crime News : सोरतापवाडीच्या महिला सरपंचाच्या घरात हुंडाबळीचा धक्कादायक प्रकार, सुनेने संपवले जीवन; पोलिसांत गुन्हा दाखल

Fire News: फर्निचर दुकानाला भीषण आग; पाच जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील लोकांचा समावेश

Jalna Crime News : जालना जिल्हयातील पारनेर येथे बहिणीला चिठ्ठी का दिली म्हणत अठरा वर्षीय पवन बोराटे याचा पोटात चाकू मारून केला खून

IND vs NZ 3rd T20I : हार्दिक पांड्याचा अविश्वसनीय झेल! किवी फलंदाज हर्षित राणासमोर पाचव्यांदा झाला फेल Video

SCROLL FOR NEXT