HCL shiv nadar left presidency for daughter roshni 
देश

नोकरी सोडून उभी केली 1.70 लाख करोड रुपयांची कंपनी; आता मुलीसाठी सोडलं अध्यक्षपद

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

नवी दिल्ली- लक्ष्य ठरवण्यासाठी स्वप्न पाहा, तुम्ही जर स्वप्नच पाहणार नाही तर तुमचं कोणतंही लक्ष्य नसेल आणि लक्ष्याशिवाय यश मिळत नाही, हे शब्द आहेत प्रसिद्ध व्यावयायिक आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी नुकतेच कंपनीचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा आता अध्यक्षपद सांभळणार आहेत. मात्र, शिव नादर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कायम असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे उद्यापासून ‘अनलॉक’
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि देशाचे मोठे उद्योगपती शिव नादर यांचा जन्म 14 जूलै 1945 रोजी झाला. दक्षिण भारतातील एक छोट्या गावातून येणारे नायर यांनी आज भारतीय आयटी क्षेत्रात आणि कॉम्युटर विज्ञान क्षेत्रात आपली जागा बनवली आहे. तामिळनाडूतून येणारे नादर एचसीएल टेक्लोलॉजीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. एचसीएस आपल्या आयटी सेवांसाठी प्रसिद्ध आहे.

शिव नादर यांनी आपल्या करिअरची सुरुवात पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंजीनियरिंगसोबत केली होती. व्यवसाय चालवण्याचा अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन ते देशातील मोठ्या तंत्रज्ञान क्रांतीत गुंतले. शिव नादर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते पहिल्यांदा अर्जून नावाच्या व्यक्तीशी भेटले होते. अर्जून त्यांच्यासारखेच व्यावसायिक प्रशिक्षक होते. तेव्हापासून आम्ही मित्र बनलो आणि आमची मैत्री आजही कायम आहे.  आम्ही दोघांनी डीसीएममध्ये काम करणाऱ्या आपल्यासारख्या अन्य व्यक्तींना एकत्र घेत काम सुरु केलं.

लंडनमध्ये सचिन पायलट यांची काश्मिरी कन्येसोबत फुलली प्रेमकहाणी
खाजगी नोकरी सोडण्यानंतर त्यांनी पाच मित्रांना सोबत घेऊन माईक्रोकॉम्प लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. 1976 साली त्यांची कंपनी डिजिटल कॅलक्युलेटर विकण्याचे काम करायची. लवकरच कंपनीचे नाव हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड (एचसीएल) ठेवण्यात आले आणि कंपनीने कॉम्प्युटर बनवण्याचं काम सुरु केलं. काही वर्षातच कंपनी जगभरात मोठा ब्रँड म्हणून उदयाला आली. 1980 मध्ये नादर यांनी सिंगापूरमध्ये आयटी हार्डवेअर विकण्यासाठी 'फार ईस्ट कॉम्युटर्स'ची स्थापना करुन आंतराराष्ट्रीय बाजारात पाय ठेवले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहीलं नाही. 1982 मध्ये त्यांच्या कंपनीने पहिला पीसी बाजारात आणला. त्यांनतर आयटी व्यवसायाची संबंधित पाच इतर कंपन्यांचे त्यांनी आपल्या कंपनीमध्ये विलय केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

Swabhimani Shetkari Sanghatana: 'कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवली'; सोन्यासारख्या ऊसला कवडीमोल भाव; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Nagpur News: सडकी सुपारी विक्रेत्यांच्या सिंडीकेटवर वार; गुन्हेशाखेची कारवाई, चार गोदामांवर छापा, ९० लाखांची सुपारी जप्त

Location Tracker : मोबाईलमधलं 'हे' App ट्रॅक करतंंय तुमचं लोकेशन? जाणून घ्या एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT