HDFC Bank executive berating colleagues over targets Video of goes viral bank take action  
देश

Video Viral : टार्गेटवरून बॉसने कर्मचाऱ्यांना झापलं; HDFC बँकेने दाखवला थेट घरचा रस्ता

रोहित कणसे

उद्योग क्षेत्राने कोरोना महामारी आणि नोटबंदी असे धक्के पचवल्यानंतर खाजगी कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. कंपन्यांकडून कर्मचाऱ्याची अनेक पातळीवर काळजी घेतली जाते, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मात्र आजही बर्‍याचदा कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिल्याच्या घटना समोर येतात.

असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIn वर समोर आला आहे. लिंक्डइनवरील सौमी चक्रवर्ती नावाच्या युजरने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर यूजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.

चक्रवर्ती यांनी शेअर केलेल्या हा व्हिडीओ HDFC बँकेतील एका ऑनलाइन बैठकीचा आहे. या व्हिडिओमध्ये बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुष्पल रॉय यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचा नमूना पाहायला मिळत आहे. व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ नंतर इतरांनीही मोठ्या प्रमाणात शेअर केला.

व्हिडीओमध्ये काय आहे?

बंगाली भाषेतील या व्हिडिओमध्ये रॉय हे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामाचे स्टेटस आणि टार्गेटवरून ओरडताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रॉय मोठ्या आवाजात कर्मचार्‍यांना दोन वेळा "शट अप" म्हणताना ऐकू येतात. तसेच कर्मचाऱ्याला मेमे देणार असल्याचेही ते म्हणाताना ऐकू येत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एचडीएफसी बँकेने कोलकाता येथील या अधिकाऱ्याला निलंबित केले. यानंतर बँकेकडून सोशल मीडिया संदर्भ देत. या प्रकरणातील प्राथमिक चौकशीच्या आधारे, संबंधित कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे आणि सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे जी बँकेच्या नियमांनुसार केली जाईल, असे एचडीएफसी बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. यासंबंधी बॅकेंने मनीकंट्रोलला माहिती दिली आहे.

कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनासाठी सहन केले जाणार नाही आणि त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना सन्मानाने वागवले गेले पाहिजे यावर आमचा विश्वास आहे असे देखील बँकेने म्हटले आहे.

दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर लगेचच अनेक युजर्सनी देशात कठोर कामगार कायद्याची मागणी केली होती. बर्‍याच संस्थांमध्ये अशा प्रकारचे वागणूक दिली जाते असेही अनेक युजर्सनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT