Siddaramaiah टिम ई सकाळ
देश

लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची भाषा करणाऱ्यांनी मंत्रीपदावर राहू नये; काँग्रेसची टिका

लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवू असे वक्तव्य कर्नाटक सरकारचे मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी केले.

निकिता जंगले

हिजाब प्रकरणावरून देशभरात पडसाद उमटले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या. यातच कर्नाटक सरकारचे मंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी हिजाब वादावर वादग्रस्त भाष्य केले आम्ही लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवू असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानावर सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी प्रतिक्रीया दिली.

एलओपी सिद्धरामय्या म्हणाले, “केएस ईश्वरप्पा यांच्या या विधानानंतर त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे”

लाल किल्ल्यावर भगवा ध्वज उभारता येईल का?, या प्रश्नावर ईश्वरप्पा यांनी खळबळजनक उत्तर दिलं होते. “आज नाही पण भविष्यात कधीतरी, देशात हिंदू विचार आणि हिंदूत्वाची चर्चा होत आहे, असं ईश्वरप्पा म्हणाले. अयोध्येत राम मंदिर बांधणार आहोत असं आम्ही म्हणायचो, तेव्हा लोक हसायचे. पण सध्या मंदिर उभारण्यात येत आहे. अगदी त्याचप्रमाणं भविष्यात भगवा हा आपला राष्ट्रध्वज होईल" असं वक्तव्य ईश्वरप्पा यांनी केलं.

“भगवा ध्वज फडकवणारे आम्हीच आहोत. या देशात जेव्हा हिंदू धर्म येईल तेव्हा आम्ही लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवू. सध्या तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे आणि सर्वांनी त्याचा मान राखला पाहीजे” असंही ईश्वरप्पा म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT