Crime News 
देश

Crime News : प्रजासत्ताक दिनी धक्कादायक घटना! हेड कॉन्स्टेबलने पोलीस स्टेशनमध्येच झाडली स्वत:वर गोळी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मात्र दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र कुमार यांनी पहाड गंज पोलिस स्टेशनच्या बॅरेक क्रमांक ३ मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्याकडून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली. 

माहिती मिळताच पोलीस ठाण्याने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव देवेंद्र कुमार असे आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

आज दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या बॅरेकमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Payal Jhambre Case : हुंडाबळी प्रकरणाचा तपास वेगवान; पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, पतीसह सासू-सासऱ्याच्या कोठडीत वाढ

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

SCROLL FOR NEXT