Head of Sahara India Subrata Roy Postponement of arrest warrant Patna sakal
देश

रॉय यांना सुप्रीम कोर्टाचा ‘सहारा’

पाटणा न्यायालयाच्या अटक वॉरंटला स्थगिती; सुनावणीला पुन्हा गैरहजर

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याच्या प्रकरणात सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. रॉय यांना अटक करण्याचा आदेश पाटणा उच्च न्यायालयाने बिहार, उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक आणि दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना शुक्रवारी दिला. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.

सहारा इंडियाच्या विविध योजनांमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी दोन हजारपेक्षा जास्त याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्या. संदीप कुमार यांच्या एकलपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले. याआधी २७ व १२ एप्रिलला झालेल्या सुनावणी सुब्रत रॉय यांना १२ मे रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहून बिहारमधील गुंतवणूकदारांनी सहारा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे कसे व केव्हा परत करणार याचा खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. पण रॉय यांनी वैद्यकीय व सुरक्षेच्या कारणावरून सुनावणीस उपस्थित न राहण्याची परवानगी याचिकांद्वारे मागितली होती. न्यायालयाने ती फेटाळून आज सकाळी साडेदहाला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात प्रत्यक्ष हजर न झाल्यास उच्च न्यायालय त्यांच्यावर अटक वॉरंट बजावेल, असेही स्पष्ट केले होते. तरीही रॉय हे आज गैरहजर राहिले.

सुब्रत रॉय यांच्या वकिलाने अंतरिम याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी आजारी असल्याने उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी व व्हर्च्युअली पद्धतीने सुनावणीला हजर राहण्याची परवानगी द्यावी.

न्यायालयापेक्षा रॉय मोठे नाहीत

न्या. संदीप कुमार म्हणाले, की उच्च न्यायालयापेक्षा सुब्रत रॉय मोठे नाहीत. आदेशाचे पालन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. आज न्यायालयात हजर न राहून रॉय यांनी मोठी चूक केली आहे. त्यांच्या अशा वर्तनावर संतप्त झालेल्या उच्च न्यायालयाने कोण आहेत हे सुब्रत रॉय सहारा जे न्यायालयात येऊ शकत नाहीत. त्यांना न्यायालयात आलेच पाहिजे आणि लोकांना येथे कशा अडचणी येतात, हे त्यांनी पाहायलाच हवे, अशा शब्दांत त्यांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Car Sales Record : दर दोन सेकंदाला विकली गेली एक कार, जीएसटी कपातीमुळे सण-उत्सवांत देशात वाहनांची सर्वाधिक विक्री

Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत असणार

Gold Rate Today : सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा चांगली बातमी! आज सोनं इतकं स्वस्त झालं, जाणून घ्या ताजे भाव!

अजितदादांच्या सांगण्यावरून मराठा पोर्टल बंद, हजारो तरुणांना फटका; नरेंद्र पाटलांचा आरोप

Bengaluru Crime : बायको प्रियकरासोबत पळून गेली; संतप्त झालेल्या पतीने चार वर्षांच्या मुलीची हत्या करून संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT