corona_ 
देश

लसीकरणाआधी केंद्र सरकारची राज्यांना विशेष सूचना; तुमच्यासाठीही महत्त्वाचे

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण (COVID-19 Vaccine) अभियानाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे एकूण 1.65 कोटी डोस खरेदी केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीकरणासंबंधात काही निर्देश दिले आहेत. 

- लस केवळ 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनाच देण्यात येईल. 

- जर कोणत्या व्यक्तीला दुसरा काही आजार असेल आणि त्याला त्याची लस घ्यायची असेल, तर दोन लशींमध्ये 14 दिवसांचे अंतर असायला हवे. 

- पहिला डोस ज्या लशीचा दिला जाईल, दुसरा डोसही त्याच लशीचा लागेल. इंटरचेंजची परवानगी नसेल. उदाहरणार्थ, कोवॅक्सिनला पहिला डोस घेतला असल्यास दुसरा डोसही कोवॅक्सिनचाच लागेल. 

जपानमध्ये धर्मांतराची लाट? 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट!

- गरोदर महिला किंवा गरोदर असण्याच्या शक्यता असणाऱ्या महिला, तसेच ज्या आपल्या बाळाला दूध पाजतात अशा महिलांना लस दिली जाऊ नये.

-जर कोणा व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणं असतील, तर तो व्यक्ती ठीक झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्याने त्याला लस दिली जावी. 

-कोरोना रुग्ण ज्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा देण्यात आले आहे, त्यांना ठीक झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनतर लस दिली जावी. 

-आजारी किंवा हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या लोकांना कोणताही आजार असला तरी त्यांना ठीक झाल्यानंतर लस 4 ते 8 आठवड्यांनतर द्यावी. 

- ज्या व्यक्तींना याआधी कोरोनाची लागण झाली आहे, ज्यांचा गंभीर आजाराचा इतिहास आहे. मग तो कार्डियक किंवा न्यूरोलॉजिकल, पलमोनरी किंवा मेटाबॉलिक असो HIVचा रुग्ण असो, अशांना लस दिली जाऊ शकते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT