Summer Survival in Kuno National Park sakal
देश

Cheetah Conservation: चित्त्यांच्या बछड्यांसाठी पाणी उपसा प्रणाली ‘जीवनरेखा’; कुनो उद्यानात तीव्र उन्हाळ्यात मिळाला आधार

Kuno National Park's Solution for Animal Survival in Heat: उन्हाळ्याच्या तीव्र झळांत कुनो उद्यानातील चित्त्यांचे बछडे पाणी उपसा प्रणालीमुळे सुरक्षित राहिले.

सकाळ वृत्तसेवा

Summer Wildlife Protection Strategies in India: भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी २०२२ मध्ये नामीबिया, दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. उद्यानात सौर ऊर्जेवर चालणारी पाणी उपसा प्रणाली तीव्र उन्हाळ्यात चित्त्यांच्या बछड्यांसाठी जणू जीवनरेखाच ठरली आहे. जूनमध्येही मध्य व वायव्य भारतात तापमानाचा ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असल्याने जलस्रोत आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत ही प्रणाली चित्त्यांची तहान भागवीत आहे.

यापूर्वी मे २०२३ मध्ये तीव्र उष्णतेमुळे ‘ज्वाला’ नावाच्या नामिबियाच्या चित्त्याच्या मादीच्या तीन बछड्यांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेतून धडा घेत अधिकाऱ्यांनी कुनो उद्यानात सौर ऊर्जेवर चालणारी पाणी उपसा प्रणाली बसविली. या प्रणालीद्वारे कुनो नदीतून पाण्याचा उपसा केला जातो आणि साडेआठ कि.मी.च्या जलवाहिनीद्वारे उद्यानात तुषार सिंचन व पाणीसाठ्याच्या १५ हून अधिक ठिकाणांपर्यंत पोचविले जाते.

अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि चित्ता प्रकल्पाचे संचालक उत्तमकुमार शर्मा यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात म्हटले आहे, की उन्हाळ्यात ‘लू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या लाटांमुळे आणि सुमारे ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेल्या तापमानाचा सामना करणे विशेषत: तरुण वन्यजीवांना खूपच कठीण होते. या पाणी उपसा प्रणालीमुळे त्यांना आधार मिळाला आहे.

बछड्यांचा पहिलाच उन्हाळा

यंदा फेब्रुवारीत ‘वीरा’ या दक्षिण आफ्रिकेच्या चित्त्याच्या मादीने दोन बछड्यांना जन्म दिला तर एप्रिलमध्ये ‘निरवा’ या मादीने पाच बछड्यांना जन्म दिला. निरवाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला, मात्र उर्वरित तीन बछड्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बछड्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच प्रखर उन्हाळ्याचा सामना केला. त्यांना उद्यानातील पाणवठ्यांवर नियमितपणे नेले जाते, हे या उपक्रमाचे यश असल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला.

कुनो उद्यानातील चित्त्यांची मादी व बछड्यांसाठी नियोजित पद्धतीने कुनो नदीतून सौर ऊर्जेद्वारे पाणी उपसा करून, अनेक किमीपर्यंत ते वाहून नेत तुषार सिंचनाच्या माध्यमातून उद्यानात हरित ठिकाणे तयार केली आहेत. त्यामुळे पाण्याची उपलब्धताही वाढली आहे. पाण्याचे महत्त्व त्याची टंचाई भासल्यानंतरच कळते. उन्हाळ्यात कुनोइतके ती कोठेच जाणवत नाही.

- उत्तमकुमार शर्मा, संचालक, चित्ता प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: डुप्लिकेट मतदारांची गोंधळकथा! मतदारयादीतील विसंगतीवर आयोगाचं स्पष्टीकरण, कुठे होते गफलत?

Minister Ashish Shelar : १७ ऑगस्ट हा शिवचातुर्य दिन म्हणून साजरा केला जाणार: मंत्री आशिष शेलार; शासन सकारात्मक निर्णय घेणार

Tejashri Pradhan Kissing Scene : किसींग सीन, रोमॅन्स करताना तिने मला खूप....तेजश्री प्रधानबद्दल काय बोलला 'तो' अभिनेता?

Latest Marathi News Updates : अडाण प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले, प्रकल्पातून ३७१ क्युमेक पाण्याचा विसर्ग

‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

SCROLL FOR NEXT