Dead Mother recovered with her children in home himachal pradesh  esakal
देश

चिमुरड्यांना कवटाळलेल्या अवस्थेत माय-लेकरांचे मृतदेह, भूस्खलनाने कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

भूस्खलनाने एकाच घरातील ८ जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांना आई चिमुरड्यांना कवटाळलेल्या अवस्थेत आढळली.

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात काशन भागात अतिपावसाने झालेल्या भूस्खलनात एकाच घरातील आठ जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी जेव्हा घरातील पार्थिव बाहेर काढण्यासाठी घराचा दरवाजा तोडत धाव घेतली तेव्हा मृत आई त्याच्या चिमुरड्याला हृदयाशी कवटाळलेल्या अवस्थेत आढळली. भूस्खलनाने कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले. (Dead Mother recovered with her children in home himachal pradesh)

माहितीनुसार ही घटना मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली असून मृत माणसे एकाच घरची आहेत. पोलिसांनी घरातील आठ जणांचे पार्थिव घराबाहेर काढले आहे. शवविच्छेदनासाठी या कुटुंबियांना रूग्णालयात पाठवण्यात आले. मंडी जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे मंडीचे डीसी अरिंदम चौधरी यांनी सांगितले.

काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेबाबत कळताच लोकांच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी तरळले. पोलिसांनी या भागात तूर्तास बंदी घातली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी चौफेर होत असलेल्या भूस्खलनामुळे रेस्क्यू टीम वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाही. गावातील लोकांनी मृत कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अशस्वी ठरले.

गावाचे प्रधान खेम सिंह यांच्या कुटुंबातील आठ जणांंपैकी प्रधान आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव मिळालं. त्यानंतर राड्यारोड्याखाली दोन मुलांचे पार्थिव त्यांना सापडले. पहाटे तीनपासून सुरू झालेल्या शोध मोहिमेच्या ऑपरेशन नंतर दुपारी १ वाजता शोध करणाऱ्यांना कुटुंबातील मृत जणांना बाहेर काढण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT