PM Narendra Modi Sakal
देश

Heeraben Modi Demise : मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन; जड अंत:करणाने मोदी कर्तव्यावर परतले!

गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. (Heeraben Modi Demise)

या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला, तसंच पार्थिवासोबत शववाहिनीतून स्मशानभूमीपर्यंत प्रवासही केला.

गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. देशभरातून विविध नेत्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

आई हिराबेन यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात पोहोचले आहेत. या ठिकाणाहून ते पश्चिम बंगाल इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या 7 हजार 800 कोटीच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर हावडा ते न्यू जलपाईगुडी ला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT