helicopter truck crash video viral on social media but not in india 
देश

Video: हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यात झाली टक्कर? पण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यातील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल करताना अनेकजण विविध शहरांचे नाव पुढे जोडतात. पण, हा व्हिडिओ भारतामधील नसून, ब्राझीलमधील असल्याची माहिती पुढे आली आहे.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. या व्हिडिओंबद्दल नक्की माहिती नसतानाही, ते व्हायरल केले जातात. सध्या सोशल मिडियावर हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यात झालेल्या टक्करीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यात टक्कर झाल्याचे दिसत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरचे पंख फिरत असताना, अचानक मागून एक ट्रक येतो, आणि त्यांची टक्कर होते. संबंधित व्हिडिओ अमृतसरच्या रतन सिंह चौकातील असल्याचा म्हटले आहे. पण, हा व्हायरल व्हिडिओ खरा असला तरी तो अमृतसर किंवा भारतातला नाही तर ब्राझीलमधील आहे.

दरम्यान, जानेवारी 2020मध्ये ब्राझीलमधील रियो ब्रांको परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या हेलिकॉप्टरचा आणि ट्रकचा अपघात झाला होता. यावेळी झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 5 जण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आयुक्त मुंढे रूजू झाल्यापासून वाढल्या कारवाया, अन्न पदार्थांच्या नमुन्यांमुळे लॅब हाऊसफुल्ल; १४ दिवसांत अपेक्षित असलेला अहवाल मिळतोय १०० दिवसांनी

ढिंग टांग : विमान उडते अधांतरी..!

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक खुलासा ! साखरपुड्याआधी चेतनसोबत राजस्थान ट्रीपवर गेली होती सिया; तिथेच शिजला भावी नवऱ्याच्या हत्येचा कट

म्युच्युअल फंड : मल्टी कॅप गुंतवणुकीची जादू!

आजचे पंचांग 29 जून 2026! वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

SCROLL FOR NEXT