with the help of humanity beggars in the pm careers for the battle of corona donate 
देश

दानशूर भिकाऱयांनी केली देशासाठी 'एवढी' मदत...

वृत्तसंस्था

वाराणसी (उत्तर प्रदेश) : देशाला कोरोना व्हायरसने ग्रासल्यानंतर अनेकजण देशाच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. येथील भिकाऱयांनीसुद्धा भीक मागून जमवलेली रक्कम देशासाठी दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोरोनाविरोधातील लढाईत संपूर्ण देश सहभागी झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ वाढला आहे. वाराणसी येथील दिव्यांग आणि कुष्ठ रोग्यांना भीक म्हणून मिळालेले 3100 रुपये त्यांनी प्रधानमंत्री केअरमध्ये दान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जनतेला कोरोनाच्या लढ्यात सहकार्य करण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. देशभरातून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. उद्योगपती, कलाकारांपासून सर्वसामान्य नोकरदारवर्गानेही आपल्याला शक्य तेवढ्या पैशांची मदत करताना दिसत आहे. वाराणसी येथील संकट मोचन मंदिर येथे विश्वनाथ कुष्ठ आश्रमामध्ये राहणारे 35 कुटुंबात 50 सदस्य पुढे आले आहेत. हे मंदिराजवळ बसून भीक मागतात आणि आपली गुजराण करतात. कोरोनाच्या लढ्यात मोदींना मदत करण्यासाठी कोणी 50 तर कोणी 20 रुपदे देऊन आपले मदत नोंदवली आहे. त्यांनी एकूण 3100 रुपये दान केले आहे. दिव्यांग कल्याण सल्लागार बोर्डाचे सदस्य डॉक्टर उत्तम ओझा यांच्याशी संपर्क साधून या कुष्ठ रोगींनी स्टेट बँकेच्या माध्यमातून पैसे पीएम केअर्समध्ये पाठविले.

दरम्यान, भिकाऱयांनी देशासाठी मदत केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. खरंच हे दानशूर आणि देशाची काळजी करणारे सैनिक आहेत, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT