Hijab Row Esakal
देश

हिजाबशिवाय येणार नाही, विद्यार्थ्यांनींच्या निर्णयामुळे सुट्टी जाहीर

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यांनींनी घेतला निर्णय

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक: कर्नाटकातील (Karnataka) हिजाब वादाला (Hijab Row)आता वेगळेच वळण लागत आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court)आदेशानंतरही काही विद्यार्थ्यांनींनी हिजाबशिवाय येणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे हुबळीतील (Hubali) महिला महाविद्यालयाला सुट्टी जाहिर करण्यात आल्याची माहिती हुबळीतील एसजेएमव्ही कॉलेज फॉर वुमन येथील प्रमुख लिंगराज अंगडी यांनी दिली आहे. (SJMV College for Women in Hubli Holidays)

विद्यार्थ्यांनींनीच हिजाबशिवाय येणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे आज हुबळीत सुट्टी जाहीर करण्यात आली.

दरम्यान, बेळगावातील लिंगराज कॉलेजमध्ये (Lingaraj College) हिजाब परीधान करून आलेल्या विद्यार्थींनीना आज परत पाठविण्यात आले. मंगळवारी (ता. १६) सरदार्स कॉलेजमध्ये (Sardars College) सामाजिक कार्यकर्त्या व पोलिसांत चकमक उडाली होती. विद्यार्थ्यांनींनीच हिजाबशिवाय येणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे आज हुबळीत सुट्टी जाहीर करण्यात आली.

कर्नाटकात बुधवारपासून (ता. ९) हिजाबचा वाद निर्माण झाला आहे. तेव्हापासून शाळांबरोबर, पदवीपूर्व व पदवी महाविद्यालये बंदच होती. सोमवारी शाळा सुरु झाल्या. मात्र शाळेत देखील मुलींनी हिजाब घालूनच प्रवेश केला. यावरून सरदार्स कॉलेजमध्ये (Sardars College) सामाजिक कार्यकर्त्या व पोलिसांत चकमक उडाली.

आज महाविद्यालये सुरु झाली. बेळगावातील लिंगराज कॉलेजमध्ये (Lingaraj College) हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थींनीना परत पाठविण्यात आले. शिक्षण मंत्र्यांनी याआधिच वर्गात हिजाब घालून येणाऱ्यांना रोखले जाईल असा आदेश काढला होता. मात्र आता विद्यार्थ्यांनींनी हिजाबशिवाय येणार नाही असा निर्णय घेतल्याने या वादाला आता वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT