बसवराज बोम्मई बसवराज बोम्मई
देश

हिजाबनंतर कर्नाटकात हलाल मांसावरून वाद; मोहीम करणार सुरू

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू : उगादी दरम्यान मोठ्या प्रमाणात मांस खरेदी होते आणि आम्ही हलाल मांसाविरोधात (Halal meat) मोहीम सुरू करीत आहोत. इस्लामनुसार हलाल मांस अल्लाहला अर्पण केले जाते, हिंदू देवतांना नाही, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते मोहन गौडा सोमवारी (ता. २८) म्हणाले. कर्नाटकातील हिंदू उजव्या विचारसरणीचा गट हलाल मांस खरेदीविरोधात मोहीम सुरू करणार आहे. कर्नाटकात हिजाबवरील बंदीवरून (Hijab Controversy) आधीच वाद सुरू असताना हे वक्तव्य आले आहे.

बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर दक्षिणेकडील राज्यात ध्रुवीकरणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. याच संघटनेने राज्यातील उडुपी येथील मंदिराच्या कार्यक्रमात बिगर हिंदू व्यापारी आणि दुकानदारांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली आहे. आता राज्याच्या इतर भागात असलेल्या मंदिरांमध्ये आयोजित वार्षिक जत्रे आणि धार्मिक कार्यक्रमांसाठीही ही मागणी केली जात आहे.

त्याची सुरुवात उडुपी जिल्ह्यात आयोजित वार्षिक कौप मरीगुडी उत्सवापासून झाली. जिथे बिगर हिंदू दुकानदार आणि व्यावसायिकांना परवानगी देऊ नये असे बॅनर लावले गेले. अशाच प्रकारचे बॅनर आता पडबिदरी मंदिर उत्सवात आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील काही मंदिरांमध्येही लावण्यात आले आहेत.

अनेक जिल्ह्यांत या मागणीचे बॅनर

हिजाबबाबत कर्नाटक (Karnataka) उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात मुस्लिमांनी (muslim) बंदला पाठिंबा दिल्याने हे पाऊल आहे. यावरून देशातील कायदा आणि भारताच्या न्याय व्यवस्थेबद्दलचा अनादर दिसून येतो. अशाच प्रकारचे बॅनर मंड्या, शिमोगा, चिक्कमगालुरू, तुमाकुरू, हसन आणि इतर ठिकाणी लावले आहेत. जेणेकरून बिगर हिंदू व्यावसायिकांना हिंदू मंदिरातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापासून रोखता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT