Basavraj Bommai Sakal
देश

Hijab Row: काँग्रेससहित विरोधकांचा संसदेतून सभात्याग

सकाळ डिजिटल टीम

बेंगलुरु: कर्नाटकातील हिजाब बंदीचे प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. हे प्रकरण आता कर्नाटक हायकोर्टामध्ये (Karnataka High Court) गेलं असून त्यावर आता सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. विविध प्रकारच्या प्रतिक्रिय व्यक्त केल्या जात असून एकूणच शैक्षणिक वातावरण गढूळ झाल्याचं चित्र आहे. (Karnataka hijab row) या प्रकरणी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. दुसरीकडे आज लोकसभेतही हे प्रकरण चर्चेला आलं. या प्रकरणी आता काँग्रेस, द्रमुक, IUML, CPM, CPI, VCK, MDMK, and JMM या पक्षांनी सभात्याग केला आहे आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत म्हटलंय की, मी सगळ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच शाळा आणि कॉलेजचे व्यवस्थापन करणाऱ्यांना तसेच कर्नाटकच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की, त्यांनी शांतता आणि सौहार्द राखावं. मी पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करण्याची मी विनंती करतोय.

हे प्रकरण आता कर्नाटक हायकोर्टामध्ये (Karnataka High Court) गेलं असून त्यावर आता सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर बोलताना कर्नाटक हायकोर्टाने म्हटलंय की, आम्ही तर्कानुसार काम करु, कायद्यानुसारच बोलू. या ठिकाणी भावना अथवा लोकभावनेच्या उद्रेकानुसार कामकाज होणार नाही. संविधान (Constitution) काय म्हणतं त्यानुसार आपण कार्यवाही करु. आमच्यासाठी संविधान हीच भगवद्गीता आहे. (Karnataka hijab row)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT