Mukhtar Abbas Naqvi 
देश

हिजाबच्या वादाला काँग्रेसनं खतपाणी घातल; केंद्रीय मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य

हिजाबबद्दल चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम काँग्रेसनेच सुरू केली

सकाळ डिजिटल टीम

हिजाबबद्दल चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम काँग्रेसनेच सुरू केली

मगील काही दिवसांपासून देशात हिजाबप्रकरणी वातावरण तापलं आहे. कर्नाटकात घडलेल्या या घटनेचे पदसाद देशभर उमटले. यात राजकीय पक्षांनी उडी घेतली असल्याने त्यांच्यावरही टीका झाली. भारताचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनीही हिजाब संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. नक्वी यांनी हिजाबबाबत काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने हिजाबच्या वादाला खतपाणी घालून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. हिजाबबद्दल (Hijab Controversy) चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम काँग्रेसनेच सुरू केली असल्याचा आरोप त्यांना केला आहे. (Hijab Row)

ते म्हणाले, कॉंग्रेसने हिजाबबाबत चुकीची माहिती पसरवण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. हिजाबच्या जातीय आक्रोशातून देशाच्या संस्कृतीवर आणि संविधानावर आक्रमण केले जात आहे. काँग्रेसने (Congress) या हिजाबच्या वादाला खतपाणी घालण्याचे काम केले असून संघटनांना आंदोलन करण्यास ते पाठिंबा देत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, देशाला बदनाम करण्याचा प्रयत्नात हे लोक यशस्वी होणार नाहीत. जर तुम्हाला घटनात्मक अधिकार असतील, तर काही घटनात्मक कर्तव्येही आहेत. अशा जातीय उन्माद, तेढ आणि जातीय दहशत वाढवून देशाची बदनामी करायची अशा चुकीच्या समजुतीत काही लोक असतीव परंतु त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.

यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या यूपी-बिहारबाबतच्या वक्तव्यावर ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने माफी मागावी. तुम्ही यूपी-बिहारच्या जनतेचा जाहीर अपमान करता आणि प्रेक्षकांप्रमाणे टाळ्या वाजवता, यापेक्षा काँग्रेसच्या मानसिक दिवाळखोरीचे दुसरे उदाहरण असू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT