Nitin Gadkari sarkarnama
देश

Nitin Gadkari - हिमाचलच्या मंत्र्याने NHAI अधिकाऱ्यावर उचलला हात ; नितीन गडकरी भडकले, म्हणाले...

Incident at Shimla: What Happened Between Rana and Jindal? - या प्रकराची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेत, नाराजी व्यक्त केल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

Mayur Ratnaparkhe

Anirudh Singh Rana assaults NHAI officer - हिमचाल प्रदेशात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे. पंचायतराज मंत्र्यांनी अधिकारी अचल जिंदाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचे सांगणयात येत आहे. या प्रकराची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेत, नाराजी व्यक्त केल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे गडकरींनी इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट करून घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला करणे ही चिंतेची बाब आहे, असं गडकरींनी म्हटलं आहे.

हिमचालचे पंचायतराज मंत्री अनिरुद्ध सिंह राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NHAI व्यवस्थापक अचल जिंदाल हे शिमला येथे तैनात आहेत. जिंदाल यांचा आरोप आहे की, सोमवार ३० जून रोजी मथु कॉलनी परिसरात जागेची पाहणी करताना मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

संबंधित अधिकाऱ्यास आता शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर शिमला येथील धाल्ली पोलिस ठाण्यात संबंधित मंत्र्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीबाबत अचल जिंदाल यांनी म्हटले आहे की, शिमला एसडीएमने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते एका साइट इंजिनिअरसोबत आले होते. या बैठकीत बहुमजली इमारतीच्या कोसळण्याच्या घटनेचा आढावा घेण्यात आला.

बैठकीनंतर अचल जिंदाल यांनी मंत्री अनिरुद्ध सिंह यांची भेट घेतली. मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी काल रात्री चाम्याना येथील निर्माणाधीन इमारत कोसळल्याबद्दल त्यांना विचारपूस केली होती. यावेळी जिंदाल यांनी त्यांना सर्व माहितीही दिली होती. कराराअंतर्गत कोणतेही नुकसान झाल्यास भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती, यावरूनच मंत्रीमोहदय भडकले.

तर या प्रकरणात एनएचएआय अधिकारी अचल जिंदाल म्हणाले, अनिरुद्ध सिंह यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मंत्र्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला आणि साइट इंजिनिअरला एका खोलीत नेले. या ठिकाणीच मारहाणही केली गेली. तसेच जिंदाल यांनी तक्रारीत हेही सांगितले की, मंत्र्यांनी त्यांच्या अंगावर पाण्याचे भांडे फेकले, यामुळे मला दुखापत झाली. रक्तस्राव झाला. सोबत असणाऱ्या साइट इंजिनिअरने मला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर हल्ला झाला. विशेष म्हणजे एसडीएम अन् इतर लोकांनी मदत केली नाही.

या घटनेनंतर एनएचआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेशचे मुख्य सचिव प्रबोध सक्सेना यांना एक गंभीर पत्र लिहिले आहे. हे पत्र ३० जून रोजी शिमला येथील भाटा कुफर येथे एनएचआय़ अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल आहे. पत्रात म्हटले आहे की, पंचायतराज मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी एसडीएमच्या उपस्थितीत एनएचआय अधिकाऱ्यांवर हल्ला झाला, ज्यामुळे अधिकारी गंभीर जखमी झाले आहे आणि त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले.

तसेच, याबाबत चिंता व्यक्त करत संतोष यादव यांनी असेही लिहिले की, अशा घटनांमुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खचते आणि प्रकल्पांच्या प्रगतीवरही परिणाम होतो. त्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच एनएचआय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. शेवटी वेळेवर कारवाई न केल्यास त्याचा थेट परिणाम हिमाचलमधील एनएचआयच्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT