A rescue operation underway after a passenger bus fell into a deep gorge in Himachal Pradesh, resulting in multiple fatalities and injuries.

 

esakal

देश

Himachal Bus Accident VIDEO : हिमाचल प्रदेशात प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली! आठ जणांचा जागीच मृत्यू,अनेक जखमी

Bus Fell Into Gorge : बसमध्ये ३५ हून अधिक होते प्रवासी, मृतांची संख्या वाढण्याची भीती; ही खासगी बस शिमलाहून कुपवीला जात होती.

Mayur Ratnaparkhe

Passenger Bus Falls Into Deep Gorge : हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे शुक्रवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस दरीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.      

ही खासगी बस शिमलाहून कुपवीला जात होती. सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधार जवळ ही बस दरीत कोसळली. बसमध्ये गर्दी होती, त्यामुळे अपघात घडताच घटनास्थळी मोठ्याप्रमाणात आरडाओरड झाली.

या भीषण अपघाताची माहिती मिळाताच स्थानिकांनी बसकडे धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना बाहेर काढणे सुरू केले. दरम्यान, जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तर अनेकाची परिस्थिती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे.

अपघाताबाबत माहिती देताना सिरमौरचे एसपी निश्चिंत सिंग नेगी यांनी सांगितले की, "कुपवीहून शिमलाला जाणारी एक खा गी बस सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधारजवळ दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो. बसमध्ये ३०-३५ लोक होते. पोलिस आणि इतर बचाव पथके जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

SCROLL FOR NEXT