congress sakal
देश

पोटनिवडणूक: हिमाचलमध्ये तिन्ही जागा काँग्रेच्या खिशात; भाजपला धक्का

विधानसभेच्या या पोटनिवडणुकीकडे लीटमस चाचणी म्हणून पाहिलं जात होतं.

सुधीर काकडे

हिमाचल प्रदेशमध्ये पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकीकडे लीटमस चाचणी म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे भाजपचं भवितव्य धोक्यात असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एका लोकसभेच्या जागेसाठी देखील या ठिकाणी काँग्रेसलाच यश मिळालं आहे.

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी लोकसभेच्या जागेवर ८७६६ मतांनी विजय मिळवला. जुब्बल कोटखाई विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे रोहित ठाकुर यांनी बाजी मारली. तर फतेहपुर विधानसभेच्या जागेवर काँग्रस उमेदवार भवानी सिंह यांनी ५७८९ मतांनी विजय मिळवला. तर अर्की मतदारसंघात देखील संजय अवस्थी या काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवला आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार असून, जय राम ठाकुर हे मुख्यमंत्री आहेत. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६८ जागांपैकी भाजपला ४४ तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं यश हे भाजपसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT