Himachal Pradesh Election 2022
Himachal Pradesh Election 2022 esakal
देश

Narendra Modi : मोदीजींची लोकप्रियता भाजपसाठी 'ट्रम्प कार्ड', निवडणुकीत होणार फायदा - CM धामी

सकाळ डिजिटल टीम

'सरकार लवकरच समान नागरी कायद्याचा मसुदा प्रस्ताव तयार करणार आहे.'

Himachal Pradesh Election 2022 : भाजप हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी तयार आहे. यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हिमाचलमध्ये भाजपचा प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) लोकप्रियता हे भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) ट्रम्प कार्ड आहे, असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Uttarakhand CM Pushkar Singh Dhami) यांनी म्हटलंय.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत धामी म्हणाले, 'उत्तराखंड सरकार लवकरच समान नागरी संहितेचा (Uniform Civil Code) मसुदा प्रस्ताव तयार करणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशची राज्य सरकारंही सत्तेत परतल्यानंतर ही पावलं उचलणार आहेत.' सीएम धामी हे पुढील महिन्यात होणाऱ्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत.

मुख्यमंत्री पुढं म्हणाले, भारतातील हिमालयीन राज्यांसाठी पंतप्रधान मोदींनी जेवढं कष्ट केलं, तेवढं कोणीही केलं नाही. त्यांनी (पीएम मोदी) उत्थान आणि विकासासाठी काम केलं आहे. मी जिथं-जिथं प्रचारासाठी गेलो आहे, तिथं काम करणाऱ्यांनाच मतदान केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. छोट्या निवडणूक लढाईतही सत्ताविरोधी लाटेचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक लोकप्रियता भाजपचं ट्रम्प कार्ड आहे. विधानसभा निवडणुकीतही हे ट्रम्प कार्ड निर्णायक ठरेल, असा विश्वासही धामींनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: दिल्लीने सामन्यावरील पकड केली मजबुत, लखनौचा निम्मा संघ गारद

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT