Himachal Election 2022
Himachal Election 2022 Esakal
देश

Himachal Pradesh Election: 'आप'चं लक्ष्य गुजरात; हिमाचलमध्ये भाजप की काँग्रेस?

संतोष कानडे

नवी दिल्लीः येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतदान होत आहे. तिथे तिरंगी निवडणूक होईल, असं सुरुवातीला वाटत असतांना आता परिस्थिती मात्र बदलली आहे. आम आदमी पक्षाने आपलं लक्ष्य गुजरातवर केंद्रित केलेलं आहे.

Himachal Pradesh and Gujarat Assembly Elections 2022

हिमाचल प्रदेशमध्ये एका पक्षाला पुन्हा सत्ता मिळत नाही, असा इतिहास आहे. मागे ३७ वर्षांपूर्वी म्हणजे १९८५मध्ये वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपने आलटून-पालटून सत्ता भोगली. त्यामुळे यावेळी सत्तारुढ असलेला भाजप बाजी मारणार की सत्ताबदल होणार? हाच खरा प्रश्न आहे.

Himachal Pradesh Elections

काँग्रेसचा निरुत्साह आणि भाजपची आघाडी

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपने ज्या तडफेने तिथे तयारी सुरु केली, ती तडफ काँग्रेसमध्ये दिसली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या हायप्रोफाईल नेत्यांनी हिमाचलप्रदेशमध्ये जात प्रचाराची सुरुवात केली. शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राज्याचा दौरा करुन भाजपसाठी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचं महत्त्व अधोरेखित केलं. काँग्रेसकडून मात्र प्रचारकामाला उशीरच झाला. स्व. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी पक्षाच्या हायकमांडला आवाहन केल्यानंतर कुठे काँग्रेसला जाग आली. दोन आठवड्यांपूर्वी प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता.

मागील काही दिवसांपासून भाजपने ज्या पद्धतीने हिमाचलमध्ये लक्ष घातल्याचं दिसून येत आहे, त्यावरुन तरी भाजपची सरशी होईल, असं दिसतंय. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह आहे. काही ठिकाणी तिकीट वाटपावरुन नाराजी आहे, परंतु नाराजीच्या फुग्यात हवाच भरली जाऊ नये, यासाठी भाजपने प्रयत्न केले आहेत.

gujrat assembly election 2022

'आप'चं लक्ष विचलित

आम आमदी पार्टीने गुजरात निवडणूक लक्ष्य केल्याने हिमाचल प्रदेश निवडणुकीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. २० सप्टेंबर रोजी आम आमदी पक्षाने चार उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली. सर्व जागांवर 'आप' निवडणूक लढवत असला तरी प्रत्यक्षात त्यांना गुजरात काबीज करण्याचा मनसुबा आहे. हा मुद्दा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचंही राजकीय जाणकार सांगतात. पंजाबमध्ये ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाला सत्ता हस्तगत करता आली त्या पद्धतीने हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवणं सोपं नाही, हे पक्षाच्या ध्यानात आलं असणार. केवळ मतांच्या विभाजनासाठी निवडणूक लढवली जात असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षातील बडे नेते गुजरात दौऱ्यात दंग आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये लक्ष घालण्याची गरज कुणालाही वाटत नाही. पंजाबमधील अनेक मंत्री आणि दिल्लीतील 'आप'चे नेते गुजरात एके गुजरात करत आहेत.

स्व. वीरभद्र सिंग यांच्या पत्नीच्या नेतृत्वात निवडणूक

पंजाबमध्ये काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांना पक्षातून बाहेर काढलं होतं. त्याचा परिणाम काँग्रेसच्या पराभवात झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यावरुन काँग्रेसने धडा घेतल्याचं दिसून येतंय. कारण हिमाचल प्रदेशमध्ये वीरभद्र सिंग यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. वीरभद्र सिंग यांच्या निधनानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंग यांचाच चेहरा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रमोट केल्याचं दिसून येतंय. प्रतिभा सिंह यांच्यासह त्यांचा मुलगा विक्रमादित्य यांना उमेदवारी देण्यात आलीय. काँग्रेसने या निवडणुकीत एक विद्यमान आमदार वगळता सर्वांना पुन्हा उमेदवाऱ्या दिल्या आहेत. परंतु अद्यापही काँग्रेस अंग झाडून कामाला लागल्याचं दिसून येत नाही.

भाजपचं 'वंदे भारत ट्रेन' आणि बरंच काही

दुसरीकडे भाजपने येनकेन प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दि. १३ ऑक्टोबर रोजी हिमालच प्रदेश येथील ऊना रेल्वे स्थानकातून चौथ्या वंदे भारत ट्रेनची सुरुवात झाली. ही एक्स्प्रेस ट्रेन हिमाचलमधल्या अंब अंदौरा ते दिल्ली अशी धावेल. पंतप्रधानांच्या हस्ते या ट्रेनचा शुभारंभ झाला, त्यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती होती. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ही कर्मभूमी आहे. हिमाचलमध्येच त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून पक्षकार्याला सुरुवात केली होती. त्यामुळे ६८ विधानसभा मतदारसंघातला खडान्खडा त्यांना माहिती आहे.

२०१७मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. ६८ जागांपैकी भाजपने ४४ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने २१ जागांवर. अपक्ष ३ सदस्य आहेत. शिवाय काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सगळ्या बाबींचा विचार केल्यास ३७ वर्षांपूर्वी काँग्रेसला ज्याप्रकारे दुसऱ्यांदा सत्ता मिळाली, तसंच यावेळीही भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असं जाणकार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT