Himachal Weather Update Esakal
देश

Himachal Weather Update: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर! सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, दरड कोसळल्याने रस्ते बंद

ढगफुटी झाल्यामुळे घरे, शेती पाण्याखाली, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशाच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. तर काही भागामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्टच्या दरम्यान मुसळधार पावसाने कहर सुरूच आहे.

सोलन जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा ढगफुटीमुळे पुरासोबत आलेल्या ढिगाऱ्यात दोन घरे आणि एक गोठा वाहून गेला आहे. या ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण बेपत्ता आहेत, पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. याशिवाय दरड कोसळल्याने अनेक महामार्ग आणि रस्ते बंद झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमधील कालका-शिमला, चंदीगड-मनाली, शिमला-धर्मशाला, पांता-शिलाई NH सह 800 हून अधिक रस्ते बंद आहेत. त्यामुळे 2000 हून अधिक मार्गावरील बससेवा बंद पडल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. रस्ते, वीज, पाणी नसल्यामुळे मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. हवामान विभागाकडून पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशमधील शेकडो घरे, अनेक गावे आणि शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरड कोसळल्याने व झाडे पडल्याने विद्युत खांब व तारांचेही मोठे नुकसान झाले आहे.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरुच आहे. राज्यातील अतिउंचीच्या भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT