Himanta Biswa Sarma And Eknath Shinde
Himanta Biswa Sarma And Eknath Shinde  esakal
देश

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हाॅटेलचे बिल का देऊ? भाजप नेत्याचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदार आसामच्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हाॅटेलमध्ये थांबले आहेत. मात्र त्यासाठी कोण पैसे मोजत आहे? यावरुन सध्या चर्चेला उधाण आले आहे. आमदारांचा हाॅटेलमधील खर्च भाजप करत असल्याचा आरोप होत आहे. यावर आसामचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Himanta Biswa Sarma Says, Neither BJP Nor Assam Paying Hotes Bills Of Shiv Sena MLAs)

भाजप (BJP) आणि आसाम (Assam) सरकारने महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचे हाॅटेलचे बिल देत नाही, असा दावा सरमा यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंध नसल्याचे सांगितले. जर काही पाहुणे आसामला आले असतील, तर ती सुरक्षित आणि त्यांची गैरसोय होणार नाही ना याची मला काळजी असते. उद्या काँग्रेस येईल, त्यावेळीही मी अशाच पद्धतीने त्यांचे स्वागत करेल, असे सरमा म्हणाले. (Maharashtra Politics)

भाजप हाॅटेलचे बिल का देईल? किंवा आसाम का देईल? उलट आसामला हाॅटेलकडून जीएसटीतून उत्पन्न मिळते. मी शिवसेनेचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आसाममधील पूराची चर्चा सुरु झाली, असे सरमा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT